राज्य नाट्य स्पर्धेचा पडदा उघडला

नगर : राज्य नाट्यस्पर्धेचे उद्‌घाटन करताना डॉ. सोमनाथ मुटकुळे, दीपक घारू, अमोल खोले, प्रकाश बाडकर, गजनान कराळे, केशव भगत, सागर मेहेत्रे आदी.

नगर – महाराष्ट्र राज्य हौशी नाट्यस्पर्धेला नगर केंद्रावरील प्राथमिक फेरीला नटराजपूजनाने गुरुवार (दि.15) पासून ‘तुकाराम कोळ्याची पोर” या नाटकाने सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्‌घाटन ज्येष्ठ रंगकर्मी दीपक घारू, ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. सोमनाथ मुटकुळे, नाट्य परिषद अहमदनगर शाखेचे अध्यक्ष अमोल खोले यांच्या हस्ते करण्यात आले.

नाट्य स्पर्धेत प्रकाश बाडकर (मुंबई), गजानन कराळे (मुंबई), केशव भगत (बीड) हे परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात येते. स्पर्धेचे हे 58 वे वर्ष आहे. यावर्षी नगर शहरासह जिल्ह्यातील 19 संघांनी भाग घेतला.

यामध्ये दि.15 नोव्हें. तुकाराम कोळ्याची पोर (अपंग सामाजिक विकास संस्था, श्रीरामपूर), दि.16 मुंबई मॉन्सून (एकात्मता युवक मंच, नगर), दि.17 छत्रपती शिवरायांचा जिहाद (एफ. के. क्रिएशन, शेवगाव), दि. 18 तीस-तेरा (जिप्सी प्रतिष्ठान, नगर), दि. 19 ती खिडकी (कलासाई नाट्यसंस्था, कोपरगाव), दि.20 अनफेअर डील (कर्णेज ऍकॅडमी, श्रीरामपूर), दि.21 दी ग्रेट एक्‍स्चेंज (नगर अर्बन बॅंक स्टाफ, अहमदनगर), दि पुत्रकामेष्टी (नगर तालुका ग्रामीण कला अकादमी, देऊळगाव), दि.23 उदरभरणम्‌ (नटेश्‍वर कला क्रीडा मंडळ, राहुरी), दि.24 आणखी एक द्रोणाचार्य (नाट्यआराधना, नगर), दि.25 भयरात्र (नवरंग नाट्य प्रतिष्ठान, नगर), दि.26 अशुद्ध बीजापोटी (रंगकर्मी प्रतिष्ठान, नगर), दि.27 प्रभाग (रंगोदय प्रतिष्ठान, नगर), दि.28 इथॉस (साईप्रीत प्रतिष्ठान, नगर), दि.29 नजरकैद (समर्थ युवा प्रतिष्ठान, नगर), दि.30 आणि धम्म (सप्तरंग थिएटर, अहमदनगर), दि. 1 डिसेंबर ओझं (सर्वमंगल बहुउद्देशीय सेवासंस्था, नगर), दि. 3 डिसेंबर प्यादं (स्वामी विवेकानंद विद्या प्रसारक मंडळ, अहमदनगर), दि. 4 डिसेंबर बाईपण (विश्‍वकर्मा क्रीडा सांस्कृतिक मंडळ, अहमदनगर) ही नाटके सादर होणार आहेत.

नाटकाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने नाट्यरसिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूज्ञसंचालन उध्दव काळापहाड यांनी केले. स्पर्धेचे समन्वयक सागर मेहेत्रे यांनी प्रास्ताविक केले, तर सहसमन्वयक शिवाजी शिवचरण यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)