संत सेना महाराज हे नाभिक समाजाचे आदर्श

नगर  – प्राचीन काळी संत, महंत, महापुरुषांचा परमार्थ हा एकनिष्ठ असायचा आपण फक्त त्यांच्या जयंत्या, पुण्यतिथी साजरी न करता त्यांचे आचार-विचार प्रत्यक्षात आचारणात आणावे. कष्ट, सेवा व भक्ती यांचा प्रत्यय ज्यांच्याकडे बघून येतो असे हे संत सेना महाराज नाभिक समाजाचे आदर्श आहेत, असे प्रतिपादन शिव व्याख्यानकार शेख अफसर यांनी केले.
नगरकर नाभिक पंच मंडळातर्फे शहरातील पानसरे गल्लीत संत सेना महाराज मंदिरात पुण्यतिथी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी व्याख्यान देताना शेख बोलत होते.

याप्रसंगी सकल नाभिक समाज, बारा बलुतेदार महासंघातील सर्व समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेख पुढे म्हणाले, संत महंत, महापुरुषांचा आदर्श आपण घ्यावा. त्यांचा काही सद्विचार, गुण आपण घ्यावे. आजचा तरुण हा व्यसनाधिन होत आहे. तरुणांनी आई-वडीलांना विसरता कामा नये. आपल्या कतृत्व नावाच नेतृत्व शिजविण्यासाठी प्रयतक्‍शिल रहा असा उपदेश करुन संत सेना महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रकाशझोत टाकला.

नाभिक समाजाने पारंपारिक व्यवसायाबरोबरच भविष्याचा विचार करावा कृती शिवाय कार्य नाही हे ध्येय समोर ठेवून कार्यरत रहा. संतसेना महाराज यांची पुण्यतिथी 12 बलुतेदार समाज एकत्र येऊन करतो हा चांगला उपकम आहे. सर्व समाज एकत्र येतो. चांगली गोष्ट आहे. पण हि एकी टिकून राहीली पाहिजे असे सांगून अफसर शेख यांनी शहीद जवानाने लिहलेले शेवटच पत्र या कवितेमधून आई, वडील, बहिण, पत्नीला सोडून जाताना ज्या भावना व्यक्त केल्या त्या भावनेने उपस्थितांना आपले अश्रु अनावर झाले होते. शेवटी शेख यांनी तरुणांना आवाहन करताना आयुष्य जगताना सकारात्मक विचार करा. आयुष्याच्या गाडीला रिव्हस गिअर नाही हे लक्षात ठेवावे.

प्रारंभी संत सेना महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करुन आरती झाली. महाप्रसादाने पुण्यतिथी उत्सवाची सांगता झाली. याप्रसंगी सकल नाभिक समाज, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे कार्यकर्ते, बारा बलुतेदार महासंघाचे प्रतिनिधी, जीवा सेना संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)