नगर महापालिका रणसंग्राम २०१८: श्रीपाद छिंदमचा प्रभाग 9 मधून अर्ज दाखल 

नगर: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमने महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग 9 क मधून आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी अनेक इच्छुकांनी ऑनलाइन प्रक्रियेद्वारे अर्ज भरून ठेवले आहेत. शुक्रवारपासून अनेकांनी ऑफलाइन पद्धतीने निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. यात शुक्रवारी सकाळी श्रीपाद छिंदमने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. छिंदम हा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे यापूर्वी स्पष्ट झाले होते. अर्थात छिंदम याने अपक्ष म्हणून हा अर्ज दाखल केला आहे. अद्याप पक्ष निश्‍चित झालेला नाही.

-Ads-

महापालिका निवडणुकीत छिंदम हा प्रचाराचा मुद्दा राहणार आहे. त्यामुळे छिंदम हा सर्वच राजकीय पक्षांकडून लक्ष होणार आहे. अशा परिस्थितीत याने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आर्श्‍चय व्यक्‍त होत आहे. तसेच कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी प्रभाग 10 अ मधून तर त्यांच्या पत्नी शीला चव्हाण यांनी प्रभाग 9 अ मधून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. प्रभाग 14 मधून गणेश भोसले, भगवान फुलसौंदर, सुरेखा भोसले, प्रभाग 13 मधून गणेश कवडे, सुभाष लोंढे यांनीही अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, प्रभाग 9 मधून छिंदम विरोधात कोण उमेदवारी करणार याकडे लक्ष लागले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
2 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)