नगर महापालिका रणसंग्राम २०१८: दलबदलूंची होणार दमछाक 

  • फोडाफोडीच्या राजकारणाच्या वेगामुळे प्रचार रणनीती बदलणार 

नगर: महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढू लागला आहे. राजकीय पक्षांनी देखील उमेदवार जाहीर करू लागले आहे. काही उमेदवार जाहीर होणे बाकी आहे. असे असतानाही प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे. या निवडणुकीत अनेकांनी दल बदलले आहेत. दल बदलणाऱ्यांना वरकरणी सुरक्षित वाटत असले, तरी त्यांची अंतर्गत त्रेधा उडाली आहे. प्रचारात शेवटच्या मतदारापर्यंत पोहचण्याची त्यांची धडपड सुरू आहे. त्यासाठी दल बदलणाऱ्यांनी प्रचाराचा वेगवेगळे फंडे वापरण्यास सुरूवात केली आहे.

महापालिकेच्या महासंग्रामाला खऱ्या अर्थाने 13 नोव्हेंबरपासून सुरूवात झाली. या प्रचाराला रंगत येईल ती 20 नोव्हेंबरपासून! महापालिकेसाठी 9 डिसेंबरला मतदान होत आहे. मतमोजणी 10 डिसेंबरला आहे. प्रचाराच्या तोफा 7 डिसेंबरच्या सायंकाळी थंडवणार आहेत. या दरम्यान, प्रचार जेवढा करता येईल, आणि मतदारांपर्यंत जेवढं पोहचता येईल, त्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू आहे. शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, आम आदमी पक्षांनी पहिल्या याद्या जाहीर केल्या आहेत. बाकीच्या उर्वरीत याद्या लवकरच जाहीर होतील. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या याद्याही उद्यापर्यंत जाहीर होतील. अनेकांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवारी जाहीर झाली नसता देखील राजकीय पक्षाच्या चिन्हावर प्रचार सुरू केला आहे. यात बहुतांशी दल बदलणाऱ्यांचा समावेश आहे.

-Ads-

या निवडणुकीत राजकीय पक्षांमध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. विद्यमान नगरसेवकांसह अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी सोयीची चूल पाहत दल बदलले आहेत. हे करताना काहींनी मतदारांचा अंदाज देखील घेतला आहे. काहींनी फक्त सोयच पाहिली आहे. फक्त सोयच पाहणाऱ्यांना आता मतदारांपर्यंत पोहचण्याचा साक्षात्कार झाला आहे. त्यासाठी त्यांची विविध मार्गाने धडपड चालू आहे. समाज माध्यमांसह, प्रचार पत्रके, मतदारांच्या गाठीभेटी, जाहिराती, तोंडी प्रचार, फेक प्रचार, पथनाट्य आदी तंत्रांचा वापर सुरू केला आहे. याचबरोबर स्टार प्रचारकांची देखील राळ उडविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राजकीय नेत्यांच्या चौकसभा घेण्याचे नियोजन ठेवण्यात आले आहे. त्यासाठी नेत्यांच्या तारखा मिळविण्याची धडपड सुरू झाली आहे. शेवटच्या मतदारापर्यंत पोहचण्याचीच धडपड यातून दलबदलूंची दिसते आहे.

सोशल मीडिया वॉर रंगणार! 
प्रचाराची राळ ही प्रत्यक्ष दिसण्याबरोबरच समाज माध्यमांवर देखील दिसणार आहे. समाज माध्यमांची वॉर रुमच काहींनी तयार केली आहे. सध्या मेसेज दिले जात आहे. प्रचार जसा पुढे सरकेल, तसा समाज माध्यमांवर जाहिरातीची रंगत वाढणार आहे. विविध आकर्षक, अशा वाक्‍यांचा वापर करत हा प्रचार होणार आहे. मोजक्‍या शब्दात मतदारांपर्यंत पोहचणे, हेच ध्येय असणार आहे. एक प्रकारे सोशल मीडिया वॉर

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)