मनपाची अतिक्रमणांवर लुटूपुटूची कारवाई

कापडबाजारात दुपारी कारवाई : पथक जाताच परिस्थिती जैसे-थे

नगर – महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने कापडबाजारातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणधारकांवर कारवाई केली. महापालिकेचे पथक येणार हेच कळात अतिक्रमणधारकांनी रस्त्यावरील त्यांची स्टॉल हटविण्यास सुरूवात केली. विशेष म्हणजे, महापालिकेच्या पथकाने त्यांच्यावर कारवाई करण्यापेक्षा त्यांना हे स्टॉल काढण्यास मदत केली. अतिक्रमणधारकांविरोधात महापालिकेची ही कारवाई म्हणजे, लुटूपुटूचा खेळ झाला. येतात आणि जातात, अशी प्रतिक्रिया महापालिकेचे पथक गेल्यानंतर कापडबाजारात होती.

-Ads-

नगर शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण करणाऱ्या हॉकर्सवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून सातत्याने कारवाई होते. प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी शहरातील प्रमुख रस्ते हे रहदारीसाठी आणि अत्यावश्‍यक सेवेसाठी मोकळे असावेत, असा आग्रह आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमण विभागाकडून सातत्याने कारवाई केली जाते. पण ही कारवाई ठोस ठरत नाही. अतिक्रमण पथक पुढे निघून गेले, की मागे पुन्हा अतिक्रमणांची परिस्थिती जैसे-थे होऊन जाते.

कापडबाजारातील प्रमुख रस्त्यावर बसलेल्या हॉकर्स यांच्यावरील आजची कारवाई तशीच झाली. पथक आले म्हणून हॉकर्स आणि रस्त्यावर मांडलेली आपली पथरी गुंडाळून घेतली. पथक येण्याची खबर हॉकर्सना अगोदरच लागली होती. त्यामुळे पथकाच्या हातीच काहीच लागले नाही. काही हॉकर्स यांनी पथक आल्यानंतर अतिक्रमण काढून घेतले. या हॉकर्स यांनी पथकातील काही कर्मचाऱ्यांनी मदत केली. त्यामुळे ही कारवाई म्हणजे मनपाच्या अतिक्रमण विभाग, हॉकर्स आणि कापडबाजारातील व्यापाऱ्यांमधील लुटूपुटूचा खेळ असल्याची प्रतिक्रिया रंगली होती.

कोतवालीतून बंदोबस्त घेण्यात गेला वेळ

कारवाईसाठी महापालिकेचे पथक कापडबाजारात दाखल झाले होते. कारवाई सुरू करण्यापूर्वी महापालिकेच्या पथकाला कोतवालीतून पोलीस बंदोबस्त घ्यायचा होता. त्यासाठी पथकातील प्रमुख अधिकारी कोतवाली पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांशी बोलत होते. यावेळी पथकातील मोठा डंपर पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावर उभा होती. याची खबरबात वाऱ्यासारखी बाजारात पसरली आहे, कारवाई अगोदरच कारवाईचा दम निघून गेला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)