‘स्थायी’वर सदस्य रूपाने वर्चस्व शिवसेनेचे राहणार

शिवसेनेचे 6, राष्ट्रवादी 5, भाजप 3, कॉंग्रेस व बसपा प्रत्येकी एक सदस्य स्थायीवर जाणार

पक्षीय बलानुसार असा असेल सदस्य कोटा

महापालिकेत शिवसेना 24, एका अपक्षासह राष्ट्रवादी कॉंग्रेस 19, भाजप 14, कॉंग्रेस 5, बसपा 4, अपक्ष व सपा प्रत्येकी 1 असे पक्षीय बलाबल आहे. स्थायी समितीचे एकूण 16 सदस्यांचे संख्याबळ आहे. पक्षीय कोट्यानुसार शिवसेना 6, राष्ट्रवादी 5, भाजप 3, कॉंग्रेस 1 व बसपा 1 असे सदस्य स्थायी समितीत नियुक्त केले जाणार आहेत.

नगर – महापालिकेचे कॉईन बॉक्‍स असलेल्या स्थायी समितीवर शिवसेनेचे वर्चस्व असणार आहे. स्थायीत सुमारे सहा सदस्य हे शिवसेनेचे असतील. स्थायीवरील वर्चस्व हे सत्ताधारी भाजपची डोकेदुखी ठरू शकते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापौर व उपमहापौरपदाच्या निवडी झाल्यानंतर आता स्वीकृत व स्थायी समिती सदस्य निवडीसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून हालचालींना वेग आला आहे.
भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाहेरून पाठिंबा दिला आहे. भारतीय जनता पक्ष स्थायीच्या खुर्चीवर कोणाला संधी देतो, याकडे लक्ष लागले आहे.

बहुजन समाज पक्षाकडे स्थायीचे नेतृत्व जाईल, असे सांगितले जात आहे. महापालिकेच्या पहिल्याच महासभेत पक्षीय कोट्यानुसार 5 स्वीकृत सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यानंतर स्थायी समिती सदस्य निवडीसाठी विशेष सभा बोलावी लागणार आहे.

बसपचे चार नगरसेवक निलंबित

महापौर व उपमहापौर निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मतदान केल्याप्रकरणी बहुजन समाज पक्षांनी त्यांच्या चार नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्याचे समजते आहे. अक्षय उनवणे, अश्‍विनी जाधव, अनिता पंजाबी व मुदस्सर शेख या नगरसेवकांवर ही कारवाई झाली आहे. प्रदेश पातळीवर पक्षाने ही कारवाई केल्याची माहिती आहे. दरम्यान भाजपने बसपाला स्थायी समितीचा शब्द दिला असल्याची चर्चा आहे. त्यातच पक्षाने या चारही नगरसेवकांवर थेट निलंबनाची कारवाई केल्याने नगरच्या राजयकी वर्तुळात खळबळ उडाली आहे. हे चार नगरसेवक काय भुमिका घेतात याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.

स्थायी समितीत महापालिकेचे आर्थिक निर्णय घेतले जातात. त्यामुळे ही समिती महत्वाची मानली जाते. या समितीत जाण्यासाठी नगरसेवक नेहमीच प्रयत्नशील असतात. स्थायी समितीचे एकूण 16 सदस्य निवडले जाणार असनू पक्षीय कोट्यानुसार त्यात या पक्षाच्या गटनेत्याच्या पत्राव्दारे सदस्याची नियुक्‍ती करण्यात येते.

शिवसेनेच्या सर्वाधिक 24 जागा असून शिवसेनेच्या वाट्याचे सर्वाधिक 6 सदस्य स्थायी समितीत जातील. त्याखालोखाल राष्ट्रवादीचे 5, भाजप 3, कॉंग्रेस 1, बसपा 1 असे सदस्य स्थायी समितीत पाठविले जाणार आहते.

दरम्यान, महापौर निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी व बसपाची आघाडी झाली आहे. सत्तेत सहभागी होणार नसल्याचे राष्ट्रवादीने स्पष्ट केलेले आहे. भाजप व राष्ट्रवादी आघाडीचा शिवसने हा प्रमखु विरोधक आहे. शिवसेनेचे सर्वाधिक 6 सदस्य स्थायी समितीत राहणार असून भाजप, राष्ट्रवादी व बसपा मिळून 9 सदस्य होतात. त्यामुळे आगामी काळात स्थायी समितीत शिवसेना व आघाडीत संघर्ष पाहायला मिळण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)