नगर महापालिका रणसंग्राम 2018 : नॉनव्हेज प्लेट 150, व्हेज प्लेट 100 रुपये

निवडणुकीसाठी लागणाऱ्या साहित्यांचे दर निश्चित

नगर – महापालिका निवडणुकी दरम्यान लागणाऱ्या विविध खर्चाचे दर आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. नॉनव्हेज प्लेट 150 रुपये तर व्हेज प्लेटला 100 रुपये, चहा 7 रुपये, रिक्षा तीन आसणीसाठी 300 रुपये 24 तासांसाठी तर हेलिकॉप्टरसाठी 85 हजार प्रतीतास याप्रमाणे लागणाऱ्या खर्चाचे दर निश्‍चित करण्यात आले आहे. त्यामुळे उमेदवारांन त्यानुसार आता निवडणुकीत खर्चाचा हिशोब निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना जमा करावा लागणार आहे.

निवडणूक म्हटले की खर्चाला नाही तोटा असे म्हणतात. परंतू आता निवडणुकीतील खर्चावर मर्यादा घालून देण्यात आल्या असून निश्‍चित केलेल्या दरानुसार उमेदवारांना आपल्या खर्चाचा हिशोब द्यावा लागणार आहे. या दरानुसार सर्व बिले द्यावे लागणार असल्याने उमेदवारांची पंचाईत होणार आहे. खर्चाचे दर निश्‍चित करतांना त्यात प्रचार साहित्यासह वाहन, जेवण, नाष्टा, सभा व त्यांना लागणारे साहित्य याचा समावेश करण्यात आला आहे.

प्रचार माध्यमामध्ये ध्वीक्षेपक 700 रुपये प्रती दिवस, ढोल ताशा प्रती दिवस 3 हजार रुपये, कापडी बॅनर 350 रुपये से.मी. मीटर, डीजीटल बॅनर 80 से.मी. मीटर, कापडी झेंडे (30 से.मी बाय 45 से.मी) साठी 55 रुपये, प्लॅस्टीक झेंडे (5.5 से.मी बाय 8.5 से.मी) साठी 45 रुपये, हॅन्ड बील (1000 प्रती) 1 हजार रुपये, पोस्टर (1000) 2200 रुपये, कमाणी प्रती दिवस 4 हजार रुपये, व्हीडीओ सी.डी. 1 हजार रुपये, ऑडीओ सीडी 300 रुपये, रिक्षा 300 रुपये 24 तासासाठी, टमटम 1 हजार 600 रुपये, जीप 1 हजार 100 रुपये, चारचाकी टेम्पो 1 हजार 100 रुपये, 18 आसणी बस 1 हजार 800 रुपये, हॉटेलचे भाडे – सिंगल एसी 1 हजार 200, नॉनएसी 800 रुपये, वाहन चालक मानधन 800 रुपये, खुर्चा प्रतीनग 14.50, लोंखडी टेबल 125 रुपये, साधा चहा 7 रुपये, स्पेशल चहा 15 रुपये, कॉफी 15 रूपये, राईस प्लेट व्हेज 80 रुपये, राईस प्लेट नॉनव्हेज 120 रुपये स्पेशल व्हजे प्लेट 100 रुपये, स्पेशल नॉनव्हेज 150 रुपये, मिनटर वॉटर 20 रुपये, शिरा प्लेट 25 रुपये, उपीट 25 रुपये, कांदा पोहे 25 रुपये, हेलिकॉप्टर 85 हजार रुपये प्रती तास. या प्रमाणे खर्चाचे दर निश्‍चित करण्यात आले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)