नगर महापालिका रणसंग्राम 2018 : महापालिका रिंगणात 351 उमेदवार

130 उमेदवारांची निवडणुकीतून माघार

नगर – महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीच्या आज अखेरच्या दिवशी 351 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिल्याचे स्पष्ट झाले. रात्री उशिरापर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अधिकृत अंतिम उमेदवारांची यादी प्रसिध्द झाली नाही.

महापालिकेच्या 68 जागांसाठी 351 उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, कॉंग्रेस, मनसे, कम्युनिस्ट, समाजवादी, बसपा या पक्षांचे अधिकृत उमेदवार रिंगणात आहेत. भाजपच्या 4 तर शिवसेना व राष्ट्रवादी प्रत्येकी 1 अशा 6 उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाले होते.

परंतु भाजपच्या एका उमेदवाराचा अर्ज खंडपीठाने बाद ठरवून उर्वरित पाच उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याने भाजपचे आता 67 ठिकाणी उमेदवार रिंगणात उतरले आहेत. सर्व जागांवर उमेदवार देणारा भाजप हा एकमेव पक्ष ठरला आहे. त्या खालोखाल शिवसेनेने 62 जागांवर तर राष्ट्रवादीने 46 जागांवर उमेदवार दिले आहेत. कॉंग्रेसला 21 जागांवरच उमेदवार देता आले आहेत. आपने 11 तर मनसेने 15 जागांवर उमेदवार दिले आहेत.

आज उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आल्यानंतर अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर जाहीरपणे प्रचाराचा धुमधडाका सुरु होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)