नगर महापालिका रणसंग्राम २०१८: भारिप एमआयएम एकत्र महापालिका निवडणूक लढविणार

नगर: भारिप बहुजन महासंघाच्या नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी अशोक सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे.दरम्यान, महापालिकेच्या निवडणूकीत सर्व जागा भारिप बहुजन महासंघ व एमआयएम एकत्र लढविणार असल्याची घोषणा सोनवणे यांनी केली.

भारिप बहुजन महासंघाच्या महासचिवपदी दिलीप साळवे, संघटक म्हणून नितीन घोडके, उपाध्यक्षपदी राजेंद्र काळे, विनोद गायकवाड यांची, तर सहसचिवपदी प्रकाश भोसले यांची निवड करण्यात आली. भारिप बहुजन महासंघाच्या शहर युवा अध्यक्षपदी योगेश साठे, महासचिवपदी सुरेश कोंडलकर, संघटक म्हणून ऍड. अतुल सरोदे यांची, तर सहसचिवपदी रंजन साळवी यांची नियुक्ती करण्यात आली.भारिप बहुजन महासंघाची शहर कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी बाबासाहेब घुले, महासचिवपदी सुनील शिंदे, सहसचिवपदी ऍड.भानुदास होले यांची तर संघटकपदी प्रा. विठ्ठल वाघमोडे यांची निवड करण्यात आली.

-Ads-

सोनवणे म्हणाले की, महापालिकेच्या जागा भारिप बहुजन महासंघ, एमआयएम, ओबीसी सेवा संघ, बारा बलुतेदार महासंघ, वंचित मराठा, बहुजन क्रांती पक्ष तसेच इतर समविचारी पक्षांना बरोबर घेऊन लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
715 :thumbsup: Thumbs up
286 :heart: Love
523 :joy: Joy
279 :heart_eyes: Awesome
281 :blush: Great
0 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)