वीजजोडणी, नावात बदल आता ऑनलाईनद्वारेच 

नगर – राज्याच्या शहरी भागात नवीन वीजजोडणी व ग्राहकांच्या नावातील बदलाचे अर्ज एक नोव्हेंबरपासून केवळ ऑनलाईनद्वारेच स्वीकारण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. याबाबतचे आदेश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिले असून तसे परिपत्रकही जारी करण्यात आले आहे.

नवीन वीजजोडणी व नावातील बदल करणे यात पारदर्शकता आणण्यासाठी तसेच जोडणीच्या संपूर्ण प्रक्रियेची सद्यस्थिती ग्राहकांना कळावी, यासाठी महावितरणने ही प्रक्रिया ऑनलाईन केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महावितरणच्या शहरी भागातील कोणत्याही कार्यालयात नवीन वीजजोडणी व नावातील बदल करण्याचे अर्ज ऑफलाईन स्वीकारले जाणार नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)