तीन हजार कोटींसाठी महावितरणची आजपासून वसुली

आठवडाभर राबविणार मोहीम; वरिष्ठ अधिकाराऱ्यांसह विशेष पथकांची स्थापना

नगर – वीजबिलाच्या वाढत्या थकबाकीला प्रतिबंध करण्यासाठी महावितरणने अहमदनगर जिल्ह्यात आजपासून (दि. 23 नोव्हेंबर) विशेष मोहीम हाती घेतली आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या विशेष मोहिमेत गावागावात कार्यरत वीज कर्मचाऱ्यांसमवेत वरिष्ठ अधिकारीही सहभागी होणार आहेत. थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा या मोहिमेद्वारे खंडित करण्यात येणार असून थकीत रक्कम भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी केले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या 6 लाख 89 हजार 19 वीज ग्राहकांकडे महावितरणचे 3072 कोटी 95 लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे. ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणला अगोदर वीज खरेदी करावी लागते. महिनाभराच्या वीज पुरवठ्यानंतर ग्राहकांना वापरलेल्या विजेचे बिल देऊन हे बिल भरण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात येते. वीज वापरानंतर जवळपास 40 ते 45 दिवसांनंतर नियमित बिल भरणाऱ्या ग्राहकांकडून त्यांनी वापरलेल्या विजेचे पैसे महावितरणला मिळतात. त्यातही अनेक ग्राहक नियमित बिल भरत नसल्याने महावितरणचा आर्थिक ताळेबंद विस्कळीत होतो.

सद्यस्थितीत वीज क्षेत्रातील उधारीचे दिवस संपल्याने महावितरणला आर्थिक आघाडीवर तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे वीजबिलाची नियमित वसुली अथवा वीज पुरवठा खंडित करणे हे दोनच पर्याय महावितरणपुढे आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील अहमदनगर शहर, अहमदनगर ग्रामीण, कर्जत, श्रीरामपूर, संगमनेर या पाचही विभागीय कार्यालयाच्या स्तरावर स्थापन केलेल्या विशेष पथकांसह गावागावात कार्यरत वीज कर्मचारी या विशेष मोहिमेत सहभागी होणार आहे. मुख्य अभियंता जनवीर आणि अधीक्षक अभियंता संतोष सांगळे हे या मोहिमेवर बारकाईने लक्ष ठेवणार असून कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

सात लाख ग्राहक थकबाकीदार

जिल्ह्यातील एकूण 9 लाख 93 हजार 76 ग्राहकांपैकी 6 लाख 89 हजार 19 म्हणजेच जवळपास 69 टक्के ग्राहक थकबाकीदार आहेत. वर्गवारीनिहाय ग्राहक व थकबाकी:- घरगुती: ग्राहक- 2 लाख 81 हजार 737, थकबाकी- 37 कोटी 61 लाख रुपये, व्यावसायिक: ग्राहक- 30 हजार 793, थकबाकी- 33 कोटी 27 लाख रुपये, औद्योगिक: ग्राहक- 6883, थकबाकी- 5 कोटी 94 लाख रुपये, कृषिपंप: ग्राहक- 3 लाख 60 हजार 153, थकबाकी- 2767 कोटी 53 लाख रुपये, सार्वजनिक पाणी पुरवठा योजना: ग्राहक- 2320, थकबाकी- 61 कोटी 56 लाख, पथदिवे: ग्राहक- 3527, थकबाकी- 164 कोटी 98 लाख, इतर: ग्राहक- 3606, थकबाकी- 2 कोटी 6 लाख.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)