धनादेशाचा अनादर झाल्यास वीजग्राहकांना दीड हजारांचा दंड

नगर- वीजबिलाचा भरणा केलेल्या धनादेशाचा कोणत्याही कारणामुळे अनादर (चेक बाऊंस) झाल्यास आता 1 हजार 500 रुपये दंड किंवा बॅंक चार्जेस यापैकी जी रक्कम जास्त असेल त्या रकमेचा दंड लावण्यात येणार आहे. पूर्वी हा दंड 350 रुपये होता.

महावितरणने वीजदराच्या निश्‍चितीकरणासाठी दाखल केलेल्या मध्यावधी आढावा याचिकेच्या सुधारित आदेशामध्ये महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने नुकताच हा आदेश दिला आहे व दि. 1 नोव्हेंबर 2018 पासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. महावितरणच्या 16 परिमंडलातील सुमारे 5 लाख 82 हजार लघुदाब वीजग्राहक हे धनादेशाद्वारे दरमहा सुमारे 542 कोटी रुपयांच्या वीजबिलांचा भरणा करतात. परंतु यातील सुमारे 10 हजार धनादेशांचा दरमहा विविध कारणांमुळे अनादर (बाऊंस) होतो.

-Ads-

त्यासाठी संबधित वीजग्राहकांना यापूर्वी 350 रुपये दंड लावण्यात येत होता. मात्र आता 1 नोव्हेंबरपासून धनादेशाचा अनादर झाल्यास 1 हजार 500 रुपये किंवा बॅक चार्जेस यापैकी जी रक्कम जास्त असेल तो दंड म्हणून लावण्यात येत आहे. नाशिक परिमंडळात दरमहा सरासरी 26 हजार 200 वीज ग्राहक त्यांच्या जवळपास 29 कोटी 80 लाख रुपयांच्या वीजबिलाचा धनादेशाद्वारे भरणा करतात. यातील जवळपास 610 ग्राहकांच्या 1 कोटी 6 लाख रकमेच्या धनादेशाचे अनादर होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

वीजबिल भरण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी दिलेला धनादेश वटणे आवश्‍यक असते. त्यानंतरच बिलाची रक्कम प्राप्त झाल्याची नोंद होते. परंतु अनेक वीजग्राहक अंतिम मुदतीच्या एक-दोन दिवसांपूर्वी धनादेशाद्वारे वीजबिलाची रक्कम भरतात. धनादेश वटण्यास साधारणतः तीन ते चार दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे ग्राहकाने देय तारखेपूर्वी कार्यालयीन कामकाजाच्या तीन दिवस अगोदर धनादेश देणे आवश्‍यक आहे. मुदतीनंतर वीजबिलाचा भरणा झाल्यास संबंधीत ग्राहकांना धनादेशाद्वारे भरलेली रक्कम थकबाकी म्हणून पुढील बिलात लागून येते किंवा कोणत्याही कारणाने धनादेशाचा अनादर (बाऊंस) झाला तर आर्थिक दंडासह वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)