मोहट्यात उज्वला गॅस योजनेतून महिलांना गॅसचे वाटप

पाथर्डी – श्रीमंताचा गॅस पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे गरीबांच्या झोपडीमध्ये पोहचला आहे. उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात घराघरात गॅस पोहोचणार असल्याने, स्वयंपाकासाठी लाकडाचा वापर कमी होऊन, वृक्षसंवर्धन होणार असल्याचे प्रतिपादन मोहोटादेवी गॅस एजन्सीचे संचालक सुनील बेळगे यांनी केले.

तालुक्‍यातील मोहटे येथे मोहटादेवी गॅस एजन्सीच्यावतीने महिलांना गॅस वाटप कार्यक्रम घेण्यात आला, याप्रसंगी बेळगे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहटे गावचे सरपंच महादेव दहिफळे होते तर, प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच दत्तू दहिफळे, लक्ष्मण दहिफळे, ग्रामपंचायत सदस्य अविनाश फुंदे, विठ्ठल बडे, बाबासाहेब दहिफळे, पांडुरंग दहिफळे, संदीप कराड, ग्रामपंचायत सदस्या आशा दहिफळे, भामाबाई दहिफळे, कौसाबाई दहिफळे, राधाबाई गिरी, जिजाबाई बडे, शुभम दहिफळे, सविता खंडागळे, लताताई शिंदे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

-Ads-

पूर्वी गॅस असणे हे श्रीमंतीचे लक्षण होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून घराघरात गॅस पोहोचविला. आगामी काळात ग्रामीण भागात एकही महिला विना गॅसची राहणार नाही. गॅस सिलेंडरसाठी पूर्वी रांगा लावाव्या लागत होत्या, मात्र आता घरपोहोच सुलभ गॅस सिलेंडर पोहोच होत असल्याने नागरिकांच्या अडचणी कमी झाल्या आहेत.

गॅसमुळे धुरांचे प्रमाण कमी होऊन, वातावरणातील प्रदूषण कमी होणार आहे. त्याचबरोबर महिलांचे आरोग्यही त्यामुळे सुधारणार आहे. स्वयंपाकासाठी लागणारे लाकूड गॅसमुळे वाचणार असल्याने वृक्ष संवर्धनाचे कामही या योजनेच्या माध्यमातून होत आहे. यावेळी मोहटे गावातील 35 महिलांना गॅसचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच महादेव दहिफळे यांनी तर, आभार मोहटा देवस्थानचे
कर्मचारी लक्ष्मण दहिफळे यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)