नगर – मोहरम सणास दि. 11 स्प्टेंबर पासून प्रारंभ होणार आहे. मोहरमची सांगता दि 21 सप्टेंबर रोजी होणार आहे. दि. 17 ते 20 सप्टेंबर या कालावधीत जिल्हयात सर्वत्र मोहरम निमित्ताने विविध यंग पार्टीच्यावतीने चादर मिरवणुक काढण्यात येतात. तसेच दि 20 रोजी कत्तलची रात्र व दि. 21 रोजी ताबूत व सवारी विसर्जन मिरवणूक काढण्यात येते.

त्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था आणि सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांना फौजदारी दंड प्रक्रिया संहिता चे कलम 144(1) लागू केला असून दि. 20 व दि. 21च्या रात्री 12वाजेपर्यत हा आदेश जारी केला आहे.

काढण्यात येणा-या मिरवणुकीत कपडे काढून अंग प्रदर्शन करणे, बॉडी शो करणे, आक्षेपार्ह अंग विक्षेप करणे, अश्‍लील हावभाव करणे , नाच करणे हे कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश हा संपूर्ण अहमदनगर जिल्हयासाठी लागू राहील असे पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)