सुमित वर्मांचा निवडणुकीच्या अनामत रकमेसाठी अनोखा उपक्रम

नगर : निवडणुकीच्या अनामत रकमेसाठी सुमित वर्मा यांनी प्रभागात सुरू केलेला उपक्रम.

नगर – ज्या प्रभागातून निवडणूक लढवायची आहे, त्या प्रभागातील प्रत्येक कुटुंबाकडून एक रुपया निधी जमा करून निवडणुकीसाठीची अनामत रक्कम भरण्याचा उपक्रम महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा सुरू केला आहे. स्थानिक नागरिकांकडून देखील या उपक्रमाला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा वर्मा यांनी केला आहे.

सुमित वर्मा हे प्रभाग क्रमांक 14 मधून मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवित आहेत. निवडणुकीची अमनात रक्कम भरण्यासाठी वर्मा यांनी प्रभागातील कुटुबीयांकडे मदत मागितली आहे. हा रुपया म्हणजे, प्रभागातील कुटुंबांबरोबर तेथील मूलभूत सुविधा निरंतर पुरविण्याची जबाबदारीची जाणिव करून देणारी आहे. हा रुपया घेऊन कुटुंबांकडून आशीर्वाद घेऊन निवडणुकाला समोरे जाणार आहे, अशी प्रतिक्रिया सुमित वर्मा यांनी व्यक्त केली आहे.

-Ads-

हा रुपया स्वीकारण्याबरोबरच प्रभागातील मतदारांशी सुमित वर्मा संवाद साधत आहेत. या संवादातून प्रभागातील विविध समस्या जाणून घेत आहेत. निवडणूक आयोगाने सांगितलेली अनामत रक्कम जमा होताच, आपण निवडणुकीचा अर्ज दाखल करणार असल्याचे वर्मा यांनी सांगितले. मनविसेचे शहराध्यक्ष परेश पुरोहित, प्रमोद ठाकूर, प्रकाश गायकवाड, मनीष मेढे, अविनाश क्षेत्रे, प्रमोद जाधव, दिनेश भालेराव, सोमनाथ कोटकर, हरी शेळके, दीपक मगर, महेश गुंड आदी या उपक्रमात सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
251 :thumbsup: Thumbs up
299 :heart: Love
3 :joy: Joy
10 :heart_eyes: Awesome
16 :blush: Great
1 :cry: Sad
3 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)