युवकांना संधी, विकासाची हमी ; मनसेचे सुमित वर्मा यांचा वेगवान प्रचार

श्रीराम येंडे : मनसेचे सुमित वर्मा यांचा वेगवान प्रचार

नगर: नगर हे पुणे-औरंगाबाद पेक्षा मागे पडले आहे. त्यास हे सत्ताधारी जबाबदारी आहे. रस्ते, पाणी, लाईट, ड्रेनेज हे मूलभूत प्रश्‍नही आज सुटलेले नाही, आताच्या निवडणुकीत नगरकरांनी विचारपूर्वक मतदान करणे गरजेचे आहे. सुमित वर्मा यांनी विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्‍नांना वाचा फोडून ते सोडविले आहेत. त्यांच्या या चांगल्या कामांच्या जोरावर त्यांना मनपामध्ये नगरसेवक म्हणून पाठवावे व आपल्या प्रभागाचा विकास साधावा,’ असे आवाहन ज्येष्ठ नेते श्रीराम येंडे यांनी केले.

-Ads-

मनसेचे अधिकृत उमेदवार सुमित वर्मा यांच्या प्रचाराचा प्रारंभ विनायकनगर येथे झाला. येंडे यावेळी बोलत होते. संतोष वर्मा, जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष परेश पुरोहित, अजय बोरा, अनिकेत शियाळ, प्रकाश गायकवाड, प्रमोद जाधव, किशोर वर्मा, प्रकाश भोमा, संकेत जरे, संदिप गायकवाड, अनिल गीते, संतोष नाबरा उपस्थित होते.

वर्मा म्हणाले, “मनसे विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्‍न मार्गी लावले आहेत. त्याचबरोबर प्रभागातील मूलभूत सुविधा मिळविण्यासाठी मनपात पाठपुरवा केला. प्रसंगी स्वखर्चातून कामे केली आहेत. प्रभागातील नागरिकांचा आपणास पाठिंबा आहे.’


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
353 :thumbsup: Thumbs up
394 :heart: Love
3 :joy: Joy
186 :heart_eyes: Awesome
19 :blush: Great
4 :cry: Sad
2 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)