अन्यथा महापालिकेत गणपती बसवू : मनसे

नगर – गणेशोत्सवात गणेश मंडळांवर महापालिका प्रशासनाने लादलेले नियम शिथिल करण्यात यावेत. अन्यथा महापालिकेमध्येच गणपती बसवण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दिला आहे. जिल्हाध्यक्ष सुमीत वर्मा यांनी याबाबत महापालिका उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांना तसे निवेदन दिले.

गणेशोत्सवाचा उत्साह हा सरकारच्या नियम अटींमुळे कमी होत चालला आहे. त्यातच मागील वर्षी ज्या मंडळांनी दंड भरला नाही, त्यांना यावर्षी मंडप उभारण्यासाठी परवानगी मिळणार नाही, असा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. हा निर्णय अनेक मंडळांना योग्य वाटला नाही. एकीकडे सणांचे महत्त्व दिवसेंदिवस कमी होत चालले आहे.

सणांचे महत्व वाढवायाचे सोडून प्रशासन मंडळांना भिती घालण्याचे काम करीत आहेत. मुळात सण साजरा करण्यासाठी नियम व अटी हव्यात कशासाठी, असा प्रश्नही मनविसेने उपस्थित केला आहे. लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने गणेशोत्सवाची सुरुवात केली आहे, त्या उद्देशाला कडक नियमावली करून अडथळा निर्माण करण्यात येऊ नये. ज्या मंडळांनी विना परवाना गणेश मंडळे स्थापन केली, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा घेण्यात आलेला निर्णय मागे घेण्यात यावा, अशी मागणीही मनविसेने केली आहे. यावेळी मनविसेचे जिल्हाध्यक्ष सुमीत वर्मा, प्रमोद जाधव, सुमीत फुलारी, अनिकेत शियाळ, महेश शेळके, स्वप्नील वाघ, सनी वैराळ, राहुल वर्मा, सुमीत उगार, निखिल देशपांडे, राजू वर्तले उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)