नीम योजनेतंर्गत युवा कामगारांची पिळवणूक

नगर : निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना देताना कामगार सेनेचे चिटणीस चंद्रकांत ढवळे व आदी.

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

नगर – केंद्र शासनाच्या एम्प्लॉयबिलिटी एन्हान्समेंट मिशन अर्थात नीम योजनेतून एमआयडीसीतील कंपनीत नोकरीला लागलेल्या युवा कामगारांचा प्रशिक्षण कार्यकाळ पूर्ण झाल्यास त्यांना सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

नीम योजनेतील युवा कामगारांची पिळवणूक होत असताना सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून याबाबत अहवाल मागविण्याची आग्रही भूमिका मांडण्यात आली.

कामगारांचा प्रशिक्षणाचा कार्यकाळ पूर्ण झाले असता त्यांना प्रमाणपत्र देऊन कामावरुन काढले जाते. प्रशिक्षण कार्यकाळ पूर्ण केलेल्या प्रशिक्षित कामगारांना कंपनीच्या सेवेत सामावून घ्यावे. पिळवणुकीबाबत सहायक कामगार आयुक्त यांना चौकशीचे आदेश देऊन 15 दिवसाच्या आत अहवाल मागविण्याची मागणी मनकासेने केली.

निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना निवेदन देण्यात आले. कामगार सेनेचे चिटणीस चंद्रकांत ढवळे, बाळासाहेब ढवळे, बाळासाहेब शिंदे, नितीन निमसे, किसन गव्हाणे, संकेत सोमवंशी, रामभाऊ सप्रे, समाधान पाटील, संतोष राऊत, दत्ता गायके उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)