मुख्यमंत्र्यांना अभ्यासासाठी घरी पाठवा- आमदार डॉ. सुधीर तांबे

माहीजळगाव (ता. कर्जत) : येथील महामार्गावर विविध मागण्यांसाठी रास्तारोको करण्यात आला, आंदोलनादरम्यान बोलताना आ. सुधीर तांबे समवेत आंदोलनकर्ते.

माहिजळगाव येथे विविध मागण्यांसाठी रास्तारोको; अडीच तास वाहतूक ठप्प

अधिकाऱ्यांची मध्यस्थी

सकाळी 11 वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. काही मिनिटातच महामार्ग ठप्प झाला. प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार किरण सावंत पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. त्यांच्या मध्यस्थीनेच आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

कर्जत – महाराष्ट्रातील परिस्थिती व समस्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चार वर्षांपासून अभ्यास करीत आहेत. तरी त्यांचा अभ्यास कच्चाच आहे. त्यांना सखोल अभ्यास करण्यासाठी कायमचे घरी पाठवा. मतदार संघाचे प्रतिनिधी पालकमंत्री असताना नागरिकांना रास्तारोको करण्याची वेळ येते ही दुर्दैवी बाब आहे, अशा शब्दात नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी मुख्यमंत्र्यांसह व सरकारवर टिका केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगर-सोलापुर महामार्गावर तालुक्‍यातील माहीजळगाव येथे रास्तारोको आंदोलनादरम्यान ते बोलत होते. कर्जत तालुका कॉंग्रेसतर्फे कर्जत तालुक्‍यात दुष्काळ जाहीर करावा, पाण्याचे टॅंकर त्वरित सुरु करावेत, जनावरांना दावनीवर चाऱ्याचा पुरवठा करण्यात यावा, कुकडीतून सीना धरणात पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे अशा विविध मागण्यांसाठी गुरुवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

तब्बल अडीच तास हे आंदोलन चालले. त्यामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच रांगा लागल्या होत्या. आंदोलनामुळे प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला. आंदोलनात कॉंग्रेस तसेच मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी अनेक आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या धोरणांवर कडाडून टीका केली. प्रविण खेडकर यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)