कुंडलिकराव जगतापांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लवकरच अनावरण : आ.जगताप

श्रीगोंदा – तात्यांच्या निधनाने माझे आणि संबंध कुकडी परिवाराचे छत्र हरपले. मात्र तात्यांचे विचार आणि संस्कार बरोबर घेऊन सामाजिक क्षेत्रात काम आहे. कुकडी कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. आता कारखान्याचे नामकरण करून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत कारखान्याला तात्यांचे नाव देणार असून तात्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करणार असल्याचे आमदार राहुल जगताप यांनी सांगितले.

तालुक्‍यातील पिंपळगाव पिसा येथे शनिवारी (दि.3) स्व. कुंडलिकराव जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमात आ. जगताप उपस्थितांचे ऋण व्यक्त करताना बोलत होते. यावेळी निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन झाले. आ. जगताप म्हणाले, आता बापू आणि तात्यांचे मार्गदर्शन लाभत नाही. मात्र त्यांचे आशीर्वाद बरोबर आहेत. तात्यांनी कारखाना उभारण्यासाठी पंधरा वर्षे अथक परिश्रम घेतले. सामाजिक कार्यात असताना कुटुंबाकडे दुर्लक्ष झाले तरी तात्यांनी आमच्यावर चांगले संस्कार केले.राजकीय क्षेत्रात काम करताना तात्यांनी नेहमी दिलेला शब्द पाळला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले, “तात्यांचा सर्वसामान्यांना मोठा आधार होता. तात्यांचे जीवन संघर्षमय गेले. तात्यांचे निधनाने तालुक्‍याचे भरून न निघणारे नुकसान झाले आहे. माजी मंत्री बबनराव पाचपुते म्हणाले, तात्या आपल्यातून गेले असले तरी त्यांच्या स्मृती कायम आहेत. तात्यांनी मोठ्या संघर्षातून कुकडी कारखान्याची उभारणी केली.

विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे म्हणाले, श्रीगोंद्यातील अनेक नेत्यांचे अनुभव आहे. तात्यांनी मात्र विखे कुटुंबीयांचा शब्द कधी पडू दिला नाही. आमचे तिसऱ्या पिढीचे संबंध असून मी आणि आमदार राहुल दोघे एकत्र राहुन काम करू. ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, घनश्‍याम शेलार, वासुदेव काळे, निवृत्त साखर आयुक्त राजेंद्र चव्हाण यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)