भाषणबाजीपेक्षा विकासकामांना प्राधान्य : आमदार जगताप

पिंपळगाव पिसा (ता. श्रीगोंदा) : आमदार राहुल जगताप यांच्या वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शनिवारी साजरा करण्यात आला.

श्रीगोंदे – माझे वडील कुंडलिकतात्या आणि शिवाजीबापू गेल्याने माझ्यासह तालुक्‍याची मोठी हानी झाली आहे. गेली चार वर्षे तात्या आणि बापूंच्या मार्गदर्शनाखाली काम करीत होतो. आता दोघांचेही मार्गदर्शन लाभत नाही. मात्र आगामी काळातदेखील भाषणबाजीपेक्षा विकासकामांना माझे प्राधान्य राहील, अशी ग्वाही आमदार राहुल जगताप यांनी दिली.

शनिवारी (दि.24) आमदार राहुल जगताप यांचा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी कुटुंबीय व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी आमदार राहुल जगताप म्हणाले, माझे वडील दिवंगत कुंडलिकराव जगताप यांनी मोठ्या संघर्षातून कुकडी कारखान्याची उभारणी केली. कारखाना सक्षमपणे सुरू आहे. आम्ही सर्व संचालक नेहमी सभासद हिताचाच विचार करतो. आमदार म्हणून असलेल्या जबाबदारीची मला जाणीव आहे.

-Ads-

गेल्या चार वर्षांत मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लावली आहेत. कुकडी’चे पाणी तालुक्‍यात सुरू असून, त्यात खोडा घालण्याचे काम विरोधक करीत आहेत. मात्र प्रत्येक लाभधारक शेतकऱ्याला पाणी मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे.

आमदार जगताप म्हणाले, राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार येणार आहे. त्यामुळे श्रीगोंद्याकडे लक्ष राहणार आहे. पक्षश्रेष्ठींनी संधी दिल्यास आपण दोन्ही कॉंग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या बळावर आरपारची लढाई करू.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
8 :thumbsup: Thumbs up
3 :heart: Love
3 :joy: Joy
13 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
2 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)