मिरजगाव – समाजात धार्मिकता वाढली तरच तरुणपिढीवर त्याचे चांगले परिणाम होतील. तसेच सुसंस्कारी समाज उभा राहील. त्यासाठीच आपल्या समाजात मंदिराचे महत्व आहे. त्यामुळे कोणतेही मंदिर उभे करताना समाज सढळ हाताने मदत करत असतो, असे मत कर्जत नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी व्यक्‍त केले आहे.

कर्जत तालुक्‍यातील चांदे बुद्रुक येथील नवले वस्ती येथील संत सावता माळी मंदिराचे भूमीपूजन राऊत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य डॉ.पंढरीनाथ गोरे होते. यावेळी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष दादासाहेब सोनमाळी, झुंबर बोरुडे, नंदकुमार नवले, आसाराम महाराज मान्यवर उपस्थित होते.

राऊत म्हणाले,कर्जत तालुका ही साधू संताची भूमी आहे. त्यामुळे संपूर्ण तालुका धार्मिकतेकडे वळलेला आहे. त्यामुळे सावता माळी मंदिर उभारणीसाठी चांदे येथील ग्रामस्थ पुढे आले आहेत. त्यांचा विचार अतिशय चांगला आहे. कारण याठिकाणी दरवर्षी येणाऱ्या दिंड्याची संख्या खूपच जास्त आहे.ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून मंदिर उभे केल्यानंतर पालकमंत्री राम शिंदे यांच्या माध्यमातून 10 लाख रुपयांच्या सभा मंडपाचे काम पूर्ण करू, या मंदिरासाठी कोणतीही मदत लागल्यास आपण कमी पडू देणार नाही. यावेळी दादासाहेब सोनमाळी, डॉ. पंढरीनाथ गोरे, लहू वतारे,रवींद्र सुद्रिक महाराज यांची भाषणे झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)