भाजप नेत्यांच्या घरातून 16 लाख लंपास

मिरजगाव भागातील झरकर यांचे घर फोडले

मिरजगाव – बंद घराचा कटरच्या सहाय्याने कडी कोयंडा तोडून घरातून चोरट्यांनी सुमारे 16 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री कर्जत तालुक्‍यातील मिरजगावमधील श्रीकृष्ण गल्लीत घडली. भाजप नेते डॉ. रमेशचंद्र झरकर यांच्या घरात ही चोरी झाली.

-Ads-

मिरजगाव येथील भाजप नेते डॉ. रमेशचंद्र झरकर हे आपल्या मुलीकडे मुंबई येथे गेले होते.मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या सार्थक बंगल्याचे मुख्य प्रवेशव्दार तोडुन घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाट तोडुन कपाटातील सोन्याचे दागिने, कोटाची सोन्याची बटने असा अंदाजे सोळा लाखांचा ऐवज चोरून नेला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. नगर येथुन आलेल्या श्‍वानपथकाने नागलवाडी रस्त्यापर्यंत माग काढला. चोरटे या ठिकाणावरून वाहनातून पळुन गेले असण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्‍त केली.

तपासासाठी पोलिसांची पथके रवाना झाल्याचे सहाय्यक फौजदार पालवे यांनी सांगितले. ठसे तज्ञांनी ठसे घेऊन पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरु केला आहे. झरकर कुटुंबिय मुंबई येथे असल्याने अद्याप गुन्हा दाखल केला नाही. पोलिसांनी पंचनामा केला असुन पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण हे तपास करत आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)