‘माझी कन्या भाग्यश्री’चे केवळ तीनच लाभार्थी

संगमनेर तालुक्यातील चार वर्षांतील चित्र; अनेक अटी, नियम शिथील करूनही अल्प प्रतिसाद 

संगमनेर – मुली जन्माचा सन्मान व्हावा, म्हणून राज्य शासनाकडून एक ते दोन मुलींवर कुटुंब नियोजन करणाऱ्या दाम्पत्याच्या कन्यारत्नांसाठी “माझी कन्या भाग्यश्री’ योजना राबवण्यात येत आहे. मात्र या योजनेची जनजागृती नसल्याने संगमनेर तालुक्‍यात केवळ आतापर्यंत 3 मुलींनाच लाभ मिळाला आहे. तर 8 प्रकरणे प्रलंबित आहेत.

राज्य शासनाने मुली जन्माच्या स्वागतासाठी 2014 मध्ये सुकन्या योजना सुरू केली. त्याला जनतेतून प्रतिसाद मिळाला नसल्याने 2015 मध्ये या योजनेचे रूपांतर “माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेत करण्यात आले. शिवाय सुकन्या योजनेच्या अटी बऱ्याच शिथिल करण्यात आल्या. दारिद्र्‌यरेषेची अटही रद्द करण्यात आली. तरीही या योजनेच्या लाभासाठी नागरिकांतून प्रतिसाद मिळू शकला नाही. आतापर्यंत केवळ 8 व्यक्‍तींनी त्याचा लाभ घेतला आहे.

रहिवासी प्रमाणपत्र, जन्म नोंदणी तक्‍ता, उत्पन्न, अपत्य प्रमाणपत्र, कुटुंब नियोजन केल्याचे प्रमाणपत्र, एका मुलीवर एक वर्षाच्या आत आणि दोन मुली असल्यास सहा महिन्याच्या आत कुटुंब नियोजन केल्याचे प्रमाणपत्र, आधार आदी कागदपत्राची पुर्तता केल्यानंतर या योजनेचा लाभ दिला जातो. एका मुलीवर एका वर्षाच्या आत कुटुंब नियोजन केले असेल तर 50 हजार रुपये त्या कन्यारत्नच्या नावावर शासनाकडून डिपॉझिट केले जाते. दोन मुलींवर सहा महिन्याच्या आत कुटुंब नियोजन केल्यास कन्यारत्नावर प्रत्येकी 25 हजार रुपये डिपॉझिट करण्याची ही योजना आहे. 18 वर्षानंतर हे डिपॉझिट व्याजासह काढता येते. मात्र, या योजनेचे जनजागृती नसल्यामुळे संगमनेर तालुक्‍यात केवळ 3 जणांनी त्याचा लाभ घेतला आहे. 8 प्रकरणे कागदपत्रे व प्रशासकीय प्रक्रियेत प्रलंबित आहेत.

जनजागृतीसाठी अंगणवाडीसेविका…

माझी कन्या भाग्यश्री या योजनेच्या जन जागृतीसाठी आता आशा कार्यकर्त्या, अंगणवाडीसेविकांना नियुक्‍त करण्यात आले आहे. गावोगावी प्रचारपत्रे वाटून जनजागृती केली जात आहे. 15 ऑगस्टपासून या जनजागृतीला प्रारंभ झाला आहे. शिवाय या योजनेतील काही अटीही रद्द करण्यात आल्या आहेत. दारिद्ररेषेखालील लाभार्थी असणे ही अट होती. परंतु ती रद्द करण्यात आली असून उत्पन्न मर्यादा ही आठ लाखापर्यंत केली आहे. असे महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे.

शासनाचीही उदासीनता…

मुलीचे शिक्षण व आरोग्य यामध्ये सुधारणा करणे, त्यांच्या उज्ज्वल भवितव्य करता आर्थिक तरतूद करणे, भ्रूणहत्या रोखणे, मुलीच्या जन्माबाबत समाजात सकारात्मक विचार आणणे, बालविवाह रोखणे, मुलींचा जन्मदर वाढविणे या उद्देशाने सुकन्या योजना सुरू करण्यात आली होती. आता या योजनेचे रूपांतर ‘माझी कन्या भाग्यश्री’ मध्ये झाले आहे. शासनाची उदासीनता अन्‌ समाजाच्या अल्प प्रतिसादात ही योजना अडकली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)