भिंगारला भाजपच्यावतीने पेढे वाटून स्वागत

भिंगार – मराठा समाजाला नोकरी व शिक्षणात 16 टक्के आरक्षणाचे विधेयक विधीमंडळात मंजूर झाल्याबद्दल भिंगार शहर भाजपतर्फे जल्लोष करण्यात आला. फटाक्‍यांची आतषबाजी करीत पेढे वाटप करुन या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.

भाजपचे नगर शहर चिटणीस वसंत राठोड, भिंगार शहराध्यक्ष शिवाजी दहीहंडे, गणेश साठे, सुरेश तनपुरे, आरपीआयचे भिंगार युवक अध्यक्ष अमित काळे, कैलास गव्हाणे, किशोर कटोरे, संतोष हजारे, ब्रिजेश लाड, अजय देवकुळे, संतोष बोबडे, अनंत रासने, अनंत बोथरा, शुभम फुलारी, मळुराज आवटी, नगरसेविका शुभांगी साठे, ज्योत्सना मुंगी, मीना मोरे, फळे, अंबादास घडसिंग उपस्थित होते.

वसंत राठोड म्हणाले, “ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला एसईबीसी या विशेष प्रवर्गातून आरक्षण देण्यात आले आहे. पूर्ण अभ्यास करुन सदर आरक्षण देण्यात आले असून, ते न्यायालयात देखील टिकणार आहे.’


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)