अहमदनगर : मराठा आरक्षणाबदल विद्यार्थी प्रतिक्रिया

“बाबांच्या डोक्‍यावरील शिक्षणाचा खर्च कमी होणार आहे. बाबांच्या मनी एकच विचार आसायचा शिक्षणावर खर्च करायचा की, लग्नावर यामुळे अनेक मराठा तरूणींचे शिक्षण अपुर्ण रहायचे. सरकारने अनुदानित व विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये एकुण जागेच्या 16 टक्‍के आरक्षण देऊन मराठा समाजाला न्याय मिळवून दिला.

– स्नेहल हराळ, विद्यार्थिनी, नगर


“कोपर्डीच्या माझ्या बहिणीने प्राणाची आहुती दिली, मात्र तिच्या प्राणाच्या आहुतीने सकल मराठा समाज एकवटला. त्याचबरोबर आरक्षण मिळावे यासाठी माझ्या 42 बंधुभावांनी प्राणाची आहुती दिली, आज खऱ्या अर्थाने त्यांना न्याय मिळाला. त्याचबरोबर जीजाऊंच्या लेकींनाही न्याय मिळाला आहे.

– तृप्ती पानसंबळ, विद्यार्थिनी, श्रीगोंदे


हे आरक्षण सकल मराठा समाज व या आंदोलनात ज्यांनी पाठिंबा दिला, जे लढले हा सर्व विजय त्यांचा आहे. सकल मराठा समाजाने मुकमोर्चे काढले, त्याचे हे फळ आहे. सरकारने माझ्या इतर मागासवर्गीय बांधवांच्या आरक्षणाला धक्‍का न लावता, आरक्षण दिले आहे. जोपर्यंत हे कायद्याच्या चौकटीत टिकत नाही, तोपर्यंत जल्लोष करणार नाही.

– विकेश लाढाणे, विद्यार्थी, नगर.


सकल मराठा समाजाने मुकमोर्चे काढले, त्याचे हे फळ आहे.सरकारने सांगितले की, 9 जून 2014 च्या अधिसुचनेनुसार उन्नत व प्रगत गटाखाली ज्या व्यक्‍ती आहेत, त्यांना आरक्षण मिळणार, त्यामुळे अजूनही काही समाज संभ्रमात आहे. यावर सरकारने स्पष्टोक्‍ती द्यावी. आरक्षणाचे मुद्दे स्पष्ट होईपर्यंत हा लढा सुरू ठेवावा लागेल.

– प्रियंका पवार, विद्यार्थिनी, श्रीगोंदे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)