अहमदनगर : मराठा आरक्षण मिळाल्याबदल राजकीय व्यक्तीच्या प्रतिक्रिया


“मराठा आरक्षणाचे गेले 38 वर्षांपासून भिजत पडलेल्या प्रश्‍नाला सरकारने अखेर न्याय दिला. मराठा समाजातील उपेक्षित जनतेला न्याय मिळाला. महाराष्ट्र राज्यात शांततेच्या मार्गाने 58 मोर्चे निघाले. परंतु समाजाने अतिशय संयम ठेवून आयोजन केले व शासनाने याचा आदर करुनचं महत्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय घेतला. विरोधकांनी 38 वर्षांपासून जाणीवपूर्वक स्वतःच्या मतलबासाठी प्रलंबित हा प्रश्‍न प्रलंबित ठेवला होता. मात्र या सरकारने वंचित मराठा समाजाला याय दिला आहे.
– सदाशिव लोखंडे खासदार


“महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणारा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा हा निर्णय आहे. राज्याच्या स्थापनेपासून राज्यात कॉंग्रेसचीच सत्ता होती. पण मराठा समाजास न्याय देऊ शकले नाही. मात्र भाजपच्या सरकारने केवळ चार वर्षात हा महात्वाचा प्रश्‍न सोडून मराठा समाजास 16 टक्के आरक्षण दिले आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय घेताना दुसऱ्या कोणावरही अन्याय होणार नाही याचीही काळजी घेण्यात आली आहे.
– दिलीप गांधी ,खासदार


“मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कॉंग्रेस आघाडी सरकारच्या निर्णयावर आज विधिमंडळात पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. सर्व विरोधी पक्षांनी मराठा आरक्षणाच्या विधेयकाला एकमुखाने पाठिंबा दिला. मराठा आरक्षणाचा नवीन कायदा सर्वांगीणरित्या परिपूर्ण असावा आणि तो लवकरात लवकर लागू व्हावा, या हेतूने आम्ही सातत्याने सरकारकडे पाठपुरावा केला. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही आम्ही सरकारवर दबाव निर्माण केला.
– राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते


“इतर समाजाच्या आरक्षणाला धक्‍का न लावता, भाजपा सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक असून, भाजप व मित्र पक्षाने निवडणूकीच्या वेळी दिलेल्या वचनाची पूर्तता केली आहे. या निर्णयामुळे समाजाच्या शालेय विद्यार्थ्यांना विशेष फायदा होणार आहे. या आरक्षणामुळे ग्रामीण भागातील खऱ्या अर्थाने मागासलेल्या मराठा समाजाला मोठे स्थैर्य लाभणार आहे.
– बाळासाहेब मुरकुटे, आमदार


“गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाची आरक्षणाची मागणी सरकारने पूर्ण केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाथर्डी शेवगाव मतदारसंघातील नागरिकांच्यावतीने अभिनंदन करते व आभार मानते. पुर्वीच्या सरकारचे आरक्षण न्यायालयात टिकले नाही. आता लवकरात लवकर आरक्षणाचे सभागृहात कायद्यात रूपांतर होईल. आरक्षण मिळाल्यामुळे आम्हा सर्वांना आनंद झाला आहे.
– मोनिका राजळे ,आमदार


“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारने मराठा आरक्षणाची घोषणा करून समाजाच्या संघर्षाला पूर्णविराम दिला आहे. आरक्षणाच्या संघर्षात शहीद झालेल्यांना देखील न्याय मिळाला पाहिजे. मराठा आरक्षणाप्रमाणेच धनगर आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणावर देखील काम झाले पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याने ग्रामीण भागातील मागासलेल्या मराठा समाजाला खरा न्याय मिळाला पाहिजे.
– शिवाजी कर्डिले, आमदार


“युती सरकारने निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मराठा समाजाला आरक्षण जाहीर केले. यापूर्वीच आरक्षण देणे गरजेचे होते. आता जाहीर केलेल्या आरक्षणाचा प्रत्यक्ष लाभ कधी मिळतो, हे सांगता येत नाही. धनगर व मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न या युती सरकारने अजून सोडवला नाही. केवळ निवडणुकीच्या तोंडावर युती सरकारने हा निर्णय घेतला आहे.
– अशोक काळे,माजी आमदार


“घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळी नमूद केले होते. की मराठा समाजाला आरक्षण द्यावे लागेल. डॉ. आंबेडकरांचं स्वप्न आज खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने पूर्ण केले. कोणाच्या ही आरक्षणाला धक्का न लावता स्वच्छ, प्रामाणिक व नितळ कार्य फडणवीस सरकारने घेतला. आरक्षणाच्या निर्णयात मुख्यमंत्री फडणवीस मुत्सद्देगिरी दिसली.
– बबनराव पाचपुते ,माजी मंत्री


“मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मी स्वतः आंदोलनात सहभागी होते. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाने मी समाधानी व आनंदी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस हे दिलेला शब्द पूर्ण करतात. दिलेला शब्द पाळणारं युती सरकार आहे. विरोधकांनी मराठा आरक्षणावरून राजकारण सुरू केले होते. विरोधकांचा डाव युती सरकारने हाणून पाडला.
– स्नेहलता कोल्हे, आमदार


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
6 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)