मराठा आरक्षणाला विरोध झाल्यास समोरचा ‘शहीद’

संग्रहित छायाचित्र

संभाजी दहातोंडे यांचा इशारा : शनिशिंगणापूरला आज महाअभिषेकाचे आयोजन

नगर – मराठा समाजाला आरक्षण खूप संघर्ष करून मिळाले आहे. या आरक्षणाचा लढा कोपर्डी (ता. कर्जत) येथील “त्या’ घटनेनंतर तीव्र झाला आहे. क्रांतीकारी मोर्चाची दखल भारतीय जनता पक्षाने घेऊन कायद्याच्या चौकटीत बसेल असे हे आरक्षणाची घोषणा केली आहे. संपूर्ण सकल मराठा समाजात या घोषणेमुळे आनंदाची लहर आहेत. यावर कोणी विरजन टाकण्याचा प्रयत्न करू नये. कोणी या आरक्षणाविरोधात न्यायालयात गेल्यास तो “शहीद’ होईल, असा इशारा अखिला भारतीय शेतकरी मराठा महासंघाचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला.

दहातोंडे म्हणाले, 15 नोव्हेंबरला नेवासा तालुक्‍यातील शनिशिंगणापूर येथे मराठा महासंघ आयोजित शेतकरी-वारकरी महासंमेलनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला 1 डिसेंबरला आरक्षण देण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यापूर्वी 29 नोव्हेंबरला मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण 16 टक्के आरक्षण जाहीर केले आहे. यामुळे आज (शुक्रवारी) शेतकरी महासंघाच्यावतीने शनिशिंगणापूर येथे जल्लोष साजरा करण्यात येणार आहे.

“कॉंग्रेसने मराठा आरक्षणासाठी योग्य कारवाई केली नाही. त्यामुळे ते आरक्षण देण्यास अपयशी ठरले. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षणाचा अभ्यास केला. विविध राज्यातील आरक्षणांचे मुद्दे अभ्यासले. त्यामुळे भाजप सरकारला मराठा आरक्षण देण्यास यश आले. कॉंग्रेसने अभ्यास केला नाही, म्हणून ते अपयशी ठरले, अशी टीका संभाजी दहातोंडे यांनी यावेळी केली. या आरक्षणाच्या मुद्यावर कोणी कोणाला छुपा पाठिंबा देऊन न्यायालयात पाठविल्यास त्याचाही बंदोबस्त करू. मराठा समाज आता कोणत्याही राजकारणाला बळी पडणार नाही.                    -संभाजी दहातोंडे; अध्यक्ष, अखिल भारतीय शेतकरी मराठा महासंघ

शेतकरी महासंघाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी गुरूवारी नगरमध्ये राज्य सरकारच्या मराठा आरक्षणाच्या घोषणनंतर आयोजित पत्रकार परिषदेतही माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा महासंघाच्या व्यासपिठावर केलेल्या घोषणेवर अवघ्या 14 दिवसांत अमंलबजावणी केल्यामुळे त्यांच्या वजनाऐवढ्या पेढ्याचे शिंगणापूरात वाटप करण्यात येणार असल्याचे दहातोंडे यांनी सांगितले. राज्यातील मराठा समाजा आरक्षण मिळावे, यासाठी मराठा महासंघ आणि शेतकरी महासंघाकडून वेळोवेळी आंदोलन करत हा विषय मार्गी लावण्याची मागणी केली होती.

शेतकरी आणि मराठा या नाण्याच्या एकच बाजू आहेत. यासाठी या दोन्ही घटकांना एकत्र आणण्यासाठी 15 नोव्हेंबरला शिंगणापूरला महासंमेलनाचे आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस हे स्वत: हजर होते. राज्यातील मराठा समाजाने आरक्षणासाठी आंदोलन करण्यापेक्षा जल्लोष करण्याचे आवाहन केले होते. त्यानूसार त्यांनी त्यांचे वचन पुर्ण केले असल्याने मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे दहातोंडे यांनी यावेळी स्पष्ट केले. यामुळेच शेतकरी महासंघाच्यावतीने शनिशिंगणापूर येथे जल्लोष साजरा करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)