मराठा आरक्षणासाठी विद्यार्थिनीची आत्महत्या

नगर – रयत शिक्षण संस्थेचे राधाबाई काळे महिला महाविद्यालयातील किशोरी बबन काकडे (वय 17, रा. कापूरवाडी, ता. नगर) या विद्यार्थिनीने मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज घडली. तोफखाना पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

किशोरीने महाविद्यालयात अकरावीच्या विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता. आईवडील हे शेतकरी आहेत. किशोरीने विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यानंतर तिची कापूरवाडीवरून महाविद्यालयात येण्यास धावपळ होणार होती. त्यामुळे तिला आईवडिलांना महाविद्यालयातील वसतिगृहात प्रवेश घेऊन दिला होता. किशोरीने आज नेहमीप्रमाणे वसतिगृहात वावरत होती. दुपारी अडीच वाजता ती वसतिगृृहातील खोलीत गेली. त्यानंतर तिने खोलीचा दरवाजा उघडला नाही. मुलींनी दरवाजा बाहेरून बराच वेळे वाजविला. परंतु आतून प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे मुलींना शंका आली. त्यावर मुलींनी सायंकाळी पाच वाजता वसतिगहाच्या प्रमुखांना संपर्क साधून किशोरी खोलीचा दरवाजा उघडत नसल्याची माहिती दिली.

महाविद्यालयाचे प्राचार्य यांनीदेखील या प्रकारावर वसतिगृहाकडे धाव घेतली. प्राचार्य यांनी तोफखाना पोलिसांना याबाबतची माहिती दिली. तोफखाना पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विशाल सणस आणि काही पोलीस कर्मचारी हे महाविद्यालयाच्या वसतिगृहात दाखल झाले. किशोरी हिच्या खोलीचा दरवाजा उघडल्यावर तिने गळफास घेतल्याचे आढळून आले. नायलॉन दोरीने तिने गळफास घेतला होता. किशोरी हिने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी या वेळी पोलिसांना सापडली आहे. चिठ्ठी चार पानी असून, त्यात मराठा आरक्षणाचे महत्त्व सांगणारा मजकूर आहे. त्यात एक कवितेचादेखील समावेश आहे.

चिठ्ठीचा सारांश हा भविष्यात मराठा समाजासाठी आरक्षणाची आवश्‍यकता सांगणारा आहे. विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळूनदेखील योग्य त्या शाखेत प्रवेश मिळत नाही. नोकरी मिळत नाही. आर्थिकदृष्ट्या मागास राहावे लागते. नोकरी आणि व्यवसायात संधीदेखील उपलब्ध होत नाहीत, अशा आशयाचा हा मजकूर आहे. पोलीस उपनिरीक्षक विशाल सणस यांनी मजकुराच्या या माहितीला दुजोरा दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)