गणेशाच्या उपासनेने मिळते मन:शांती 

काळे : उज्ज्वला महिला मंडळाच्या वतीने अथर्वशीर्ष पठण

नगर – विघ्नहर्ता गणेशाचे आगमन झाल्यावर सर्वत्र उत्साहाचे व भक्तीपूर्ण वातावरण होते. नगरमध्येही मोठ्या उत्साहात नागरिक गणेशोत्सव साजरा करतात. सर्व नगरकरांचे श्रद्धास्थान असलेले विशाल गणेश मंदिर आता नव्या रुपात साकार झाले आहे. त्यामुळे विशाल गणेशावरची श्रद्धा आणखी वाढली आहे. या विशाल गणेशाच्या उपासनेने मनशांती मिळते, असे मत माजी उपमहापौर व उज्वल महिला मंडळाच्या अध्यक्ष गीतांजली काळे यांनी व्यक्त केले.

शहराचे ग्रामदैवत विशाल गणेश मंदिरात गणेशोत्सवानिमित्त आगरकर मळ्यातील उज्वल महिला मंडळाच्या वतीने सामूहिक अथर्वशीर्षचे पठण करण्यात आले. त्या वेळी काळे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, की गणेशोत्सव काळात या ठिकाणी होत असलेल्या धार्मिक व सामाजिक उपक्रमांमुळे भाविकांना चांगली पर्वणी मिळत आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक या मंदिरात येतात.

उज्वल महिला मंडळाही या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतात. गेल्या चार वर्षांपासून विशाल मंदिरात सामूहिक अथर्वशिषाचे पठण करत आहोत. गणेशाची उपासना अथर्वशीर्षाच्या पठणाने होत असते. मंदिराचे विश्‍वस्त ट्रस्टी अशोक कानडे यांच्या सहकार्याने उज्वल महिला मंडळाला अथर्वशीर्ष पाठ करून गणेशाची सेवा करण्याची संधी मिळते आहे.

या वेळी स्मिता फडके, नीलिमा शिंदे, विद्या काळे, संगीता देशपांडे, पूजा चौहान, प्रज्ञा गांगर्डे, गाजरे, संगीता कावरे, सुनीता आगरकर, गायत्री आगरकर, नलिनी काळे, प्रतिभा पाटील, सुलभा मुळे, रोहिणी आडे, प्रज्ञा बापट आदी उपस्थित होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)