महापालिका खत प्रकल्पाची लागली वाट

प्रशासनाबरोबर राजकीय ससेमिऱ्यामुळे बुरुडगाव प्रकल्प दहा महिन्यांपासून बंद

-जयंत कुलकर्णी

-Ads-

नगर – महापालिका प्रशासनाबरोबर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या ससेमिऱ्यामुळे शहरातील दोन्ही खत प्रकल्पांची वाट लागली आहे.आपल्या मनाप्रमाणेच ठेकेदाराने काम करावे, या उद्दिष्टे सातत्याने या ना त्या कारणावरून खत निर्मिती ठेकेदराला आरोपीच्या पिंचऱ्यात उभे करण्याच्या खटाटोपामुळे खत प्रकल्पाचे भवितव्य अंधारात सापडले आहे. बुरुडगाव येथील कचरा डेपोजवळील खत प्रकल्प गेल्या दहा महिन्यांपासून बंद आहे. तो निविदा प्रक्रियेत अडकला आहे. तर सावेडी येथील प्रकल्पांवर ताण पडला आहे. पण त्या ठेकेदाराचे थकलेले पैसे देण्यास प्रशासकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याने तो प्रकल्प आता लवकरच गुंडाळला जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. सत्ताधाऱ्यांसह अधिकाऱ्यांना या खत प्रकल्पाचे काहीच देणे-घेणे न राहिल्याने लवादाने दिलेल्या आदेशाची एैशीतशी करण्यात आली आहे.

बुरुडगाव रस्त्यावर महापालिकेचा कचरा डेपो आहे. शहराच्या विविध भागातून रोज संकलित होणारा सुमारे 125 ते 130 टन कचरा येथे टाकला जातो. या त्रासास कंटाळून बुरुडगावच्या रहिवाशांनी हरित लवादाकडे दाद मागितली होती. लवादाने जिल्हाधिकाऱ्यांना कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना महापालिकेला साडेचार कोटी रुपये निधी देवून हा खत प्रकल्प उभारला होता. संबंधित ठेकेदाराची मुदत गेल्या डिसेंबर 2017 मध्येच संपली. अर्थात तशी मुदत सप्टेंबर महिन्यात संपली होती. परंतू निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी व नव्याने ठेकेदाराची नियुक्‍ती होईपर्यंत या जुन्याच ठेकेदाराला मुदत वाढ देण्यात आली होती. डिसेंबर 2017 मध्ये या ठेकेदाराची मुदत संपल्यानंतर खत निर्मिती प्रकल्प बंद पडला आहे.

गेल्या दहा महिन्यांपासून घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या अधिकाऱ्यांना चालढकल केली आहे. गेल्या दहा महिन्यात खत निर्मिती प्रकल्पांसाठी ठेकेदाराची नियुक्‍ती होवू शकली नाही. हे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचे मोठे अपयश आहे. पण प्रशासनाच्या दृष्टीने दुदैवी बाब आहे. जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्‍त राहुल द्विवेदी यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांनी गेल्या सहा महिन्यात हा खत प्रकल्पांचा विषय मार्गी लावला नाही. त्यामुळे महापालिकेच्या कामकाजाबद्दल शंका व्यक्‍त होत आहे. अधिकाऱ्यांना दहा महिन्यात ठेकेदारा नियुक्‍त करता येत नसले तर सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष आहेच पण त्यांचा अंकुश नसल्याचे दिसत आहे. तसेच आयुक्‍तांच्या आदेशाला अधिकाऱ्यांकडून किमत दिली जात नसल्याचे आता स्पष्ट होत आहे.

बुरुडगाव कचरा डेपोमधील खत प्रकल्प बंद झाल्याने तेथील ग्रामस्थांना आता कचऱ्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. त्या सावेडी येथे दुसरा खत प्रकल्प सुरू झाल्याने शहरातील सर्वच कचरा आता या ठिकाणी आणला जात आहे. त्यामुळे या प्रकल्पावर ताण पडला आहे. सध्या 60 ते 70 टन खत निर्मिती होत आहे. परंतू हा प्रकल्प चालविणाऱ्या ठेकेदाराला प्रशासनासह सत्ताधाऱ्यांकडून त्रास दिला जात आहे. या ठेकेदाराचे महापालिकेकडे तब्बल 70 लाख रुपये देयके प्रलंबित आहे. हे मिळावेत म्हणून वारंवार मागणी करण्यात आली. परंतू देयके देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.

घनकचरा व्यवस्थापन अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या अडवणूकीमुळे ठेकेदार आता वैतागला असून या सावेडी खत प्रकल्पांची मुदत संपण्यापूर्वी तो हे प्रकल्प बंद करण्याच्या विचारात आहे. मध्यतंरी ठेकेदाराने प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला होता. परंतू नगरकरांचे हित डोळ्यासमोर ठेवून त्याने हा प्रकल्प आतापर्यत चालू ठेवला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)