नगर महापालिका रणसंग्राम: निवडणुकीसाठी 715 अर्ज दाखल

अखेरच्या दिवशी 493 अर्ज; केडगाव उपनगरातील राजकीय भूंकपाचीच चर्चा

नगर: महापालिका निवडणुकीसाठी आज मंगळवारी अखेरच्या दिवशी विक्रमी 493 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या अर्जांची संख्या 715 एवढी झाली आहे. महापालिका निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरची मुदत होती. याच दिवशी केडगाव उपनगरात राजकीय भूंकप घडला. कॉंग्रेसच्या नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या राजकीय भूंकपाचीच चर्चा शहरात दिवसभर होती.

राजकीय पक्ष, उमेदवार व त्यांच्या समर्थकांची सकाळपासूनच अर्ज दाखल करण्यासाठी धावपळ सुरू झाली होती. दुपारी तीन वाजता या धावपळीला अधिकच वेग आला होता. सावेडी, शहर मध्यभाग, बुरूडगाव आणि केडगाव निवडणूक कार्यालयात आज सुमारे 493 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आजपर्यंत दाखल झालेल्या अर्जांची संख्या 715 एवढी आहे. रात्री उशिरापर्यंत निवडणूक कार्यालयाकडून याची माहिती मिळाली. सावेडी प्रभाग क्रमांक एक कार्यालयात 53, सावेडी प्रभाग दोनमध्ये 84, शहर कार्यालय एकमध्ये 131, शहर कार्यालयात दोनमध्ये 93, बुरूडगाव कार्यालयात 53 आणि केडगाव कार्यालयात 79, असे एकूण 493 अर्ज आज दाखल झाले होते.

नगर शहराच्या केडगाव उपनगरात राजकीय भूकंप या अखेरच्या दिवशीच घडला. याचवेळी उमेदवारी दाखल करणाऱ्यांमध्ये वेग वाढला होता. महापौर सुरेखा कदम, महापालिकेतील विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे, स्थायी समितीचे सभापती बाबासाहेब वाकळे, सभागृहनेते गणेश कवडे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सारिका भूतकर, माजी सभापती किशोर डागवाले, गणेश भोसले, सुवर्णा जाधव, सचिन जाधव, गटनेते समद खान, दत्ता कावरे, माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, माजी पदाधिकारी आरिफ शेख, अशोक बडे, माजी नगरसेवक विनित पाऊलबुधे, नगरसेविका रूपाली वारे, उषा नलवडे, सुभाष लोंढे, दिपाली बारस्कर, मनीषा बारस्कर-काळे, योगीराज गाडे, भैय्या उर्फ महेंद्र गंधे, सोनाबाई शिंदे, स्वप्नील शिंदे, सुनील कोतकर, सुनिता कांबळे, शितल जगताप, ज्योती गाडे, वैशाली कुसळकर-शेलार, संपत बारस्कर, मीना चव्हाण, शारदा ढवण, जयंत येलूलकर, मनोज दुल्लम, विणा बोज्जा, आशा कराळे, डॉ. सागर बोरूडे, कुमार वाकळे, दीप चव्हाण, सुवेंद्र गांधी, अविनाश घुले यांनी आज शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केले.

दाखल झालेले एकूण उमेदवारी अर्ज

सावेडी 1 कार्यालय : 109
सावेडी 2 कार्यालय : 108
शहर 1 कार्यालय : 164
शहर 2 कार्यालय : 135
बुरूडगाव कार्यालय : 79
केडगाव कार्यालय : 120
एकूण दाखल अर्ज : 715


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)