संग्रहित छायाचित्र

चांदा – नेवासा तालुक्‍यातील महालक्ष्मी हिवरे शिवारात केदार वस्तीवर पुन्हा बिबट्याने दर्शन देऊन गणेश तिकोणे यांचे वस्तीवरुन एक कुत्रे फस्त केले. याबाबत सविस्तर वृत्त असे की 12 दिवसांपुर्वी येथील मारुती केदार यांच्या वस्तीवर एक बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला होता. तो बिबट्या जेरबंद झाल्यानंतर वस्तीवरील नागरिकांनी पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी वनविभागाकडे केली होती.

मात्र पिंजरा लावला नाही. या दुसऱ्या बिबट्याच्या दर्शनाने रात्रीच्या वेळेस वस्तीवरील शेतकरी वस्तीवरुन बाहेर पडत नाहीत. पहिला बिबट्या ज्या ठिकाणी जेरबंद झाला त्याच ठिकाणी दुसरा बिबट्या येतोय व त्याच वस्तीलगत असलेली गणेश तिकोणे यांच्या वस्तीवरील एका कुत्र्याची शिकार करुन ते फस्त करतो तर मग असे बिबटे किती? असा प्रश्‍न नागरीकांना पडला आहे.

वनविभागाने लवकरात लवकर आम्हाला पिंजरा उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी मारुती केदार, आण्णासाहेब केदार, रावसाहेब घोडके, गणेश तिकोणे आदींनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)