अस्मिता जागराने शहरात अादिवासी दिन

नगर – महादेव कोळी युवा सेवा संघाच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी अस्मितेचा जागर करीत शहरातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सादर करण्यात आलेल्या पारंपरिक आदिवासी लोकनृत्याच्या आविष्काराने नगरकरांचे लक्ष वेधले. तसेच आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

माळीवाडा बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मिरवणुकीचे प्रारंभ करण्यात आले. या मिरवणुकित आदिवासी समाज बांधवांसह युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. अकोले तालुक्‍यातील पांजरे येथील आदिवासी रत्न ठकाबाबा गांगड ग्रुपने फुगडी भोंडला नृत्य सादर करून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले. नंदूरबार येथील मुलींनीही आदिवासी संस्कृतीवर आधारित लोकगीते, लोकनृत्ये सादर केली.

मिरवणुकीनंतर टिळक रोड येथील सरस्वती सांस्कृतिक भवन येथे आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉ. संजय लोहकरे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. चिंतामण धिंदळे, डॉ. कैलास महाले, ज्ञानदेव मुकणे, किरण देशमुख, उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर, संजय गंभिरे, नगरसेविका प्रतिभा भांगरे, जिल्हा पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. एल. बी. भांगरे, दादाभाऊ लोहकरे, रामनाथ कचरे, काशिनाथ गवारी उपस्थित होते.

या कार्यक्रमास शहरासह जिल्ह्यातील आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश शेळके, नितीन साबळे, शंकर लांघी, किरण शेळके, देवा कोंडार, दीक्षा भांगरे, हेमंत घोडे, भगवान कोंडार, विवेक भांगरे, रवी कोंडार, नवनाथ साबळे, गणेश शेळके, वैभव साळवे, हिरामण पोपरे यांनी परिश्रम घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)