पिचडांच्या प्रकृतीची कार्यकर्त्यांकडून चौकशी

अकोले – मागील पंधरा दिवस मुंबई येथील लीलावती रुग्णालयात माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्यावर उपचार सुरू होते. ते आज सकाळी मुंबई-नाशिक मार्गे अकोले येथे आले. तेव्हा अनेकांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.
अकोलेकडे येताना त्यांनी तांभोळ येथे काही काळ विसावा घेतला.

अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी रशीद शेख यांचे चार दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले होते. यावेळी त्यांचे वडील जैनूभाई शेख यांची भेट घेऊन पिचड यांनी सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी अगस्ती आश्रमात जाऊन अगस्ती महाराजांचे दर्शन घेतले. तेथे देवस्थानचे अध्यक्ष के. डी. धुमाळ यांनी त्यांचे स्वागत केले.

त्यानंतर ते अगस्ती सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर गेले. तेथे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष व कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर, कार्यकारी संचालक भास्करराव घुले व अन्य संचालकांनी त्यांचे स्वागत केले. अकोले येथे आले असता त्यांच्या चाहत्यांनी त्यांना भेटण्यासाठी गर्दी केली होती. राष्ट्रवादी किसान सभेचे प्रांतिकचे उपाध्यक्ष मधुकरराव नवले, पक्षाचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, सचिव यशवंत आभाळे, अकोले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जे. डी. आंबरे आदींनी त्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले.

पिचड म्हणाले, आजारपणातही तालुक्‍याची आठवण स्वस्थ बसून देत नव्हती. म्हणून मी आज मुद्दाम आलो आहे. यावेळेस कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सोन्याबापू वाकचौरे, अध्यक्ष दादा पाटील वाकचौरे, संपत कानवडे त्याचबरोबर अकोले नगरपंचायतीचे उपाध्यक्ष बाळासाहेब वडजे, माजी उपाध्यक्ष प्रकाश नाईकवाडी, नगरसेवक परशुराम शेळके, सचिन शेटे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गिरजाजी जाधव, कारखान्याचे संचालक राजेंद्र डावरे, भाऊसाहेब कासार, बाळासाहेब भोर, किसन नागू देशमुख, अर्जुन गावडे, अण्णासाहेब एखंडे, राहुल देशमुख, बाळासाहेब साबळे आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)