आ. थोरातांकडून पिचड यांच्या तब्येतीची चौकशी

अकोले – माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांचे भावाभावाचे नाते सर्वश्रृत आहे. एक भाऊ रुग्णालयात उपचार घेत असताना दुसऱ्याभावाने मुंबई येथील लीलावती रुग्णालयात जाऊन आपल्या मोठ्या भावाच्या प्रकृतीची विचारपूस केली. या भेटीतून दोन माजी मंत्र्यांमधील जिव्हाळा या निमित्ताने पुढे आला.

अकोले व संगमनेर या दोन तालुक्‍यांमध्ये गेले दीर्घकाळ राजकीय सामंजस्याचे व सामाजिक सलोख्याचे कायम वातावरण राहिले आहे. भावा भावाचे नाते हे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्यापासून आजपर्यंत कायम टिकून आहे. भाऊसाहेब थोरात यांचे निधन झाल्यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही हे नाते जपले.

-Ads-

माजी मंत्री पिचड लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. हे कळताच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, आमदार हेमंत टकले, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यानंतर आज माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पिचड यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि पूर्णपणे बरे व्हा, अशी सदिच्छा व्यक्त केली.

पिचड हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, तर बाळासाहेब थोरात हे अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीचे सदस्य आहेत. मात्र याप्रसंगी त्यांनी आपले भावाभावांचे नाते जपत व पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून पिचड यांच्या प्रकृतीची चौकशी केली. तसेच त्यांना लवकरात लवकर बरे होण्याच्या सदिच्छा दिल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
136 :thumbsup: Thumbs up
37 :heart: Love
1 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
9 :blush: Great
1 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)