साई आदर्श मल्टिस्टेटचा प्रगतीचा आलेख दीपस्तंभाप्रमाणे – खा. लोखंडे

राहुरी फॅक्‍टरी – साई आदर्श मल्टिस्टेट संस्थेच्या प्रगतीचा आलेख दीपस्तंभाप्रमाणे वाढता आहे. संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव कपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने केलेल्या पारदर्शक कारभाराची सभासद व ग्राहकांनी दिलेली ही पावती असल्याचे गौरव उद्‌गार खासदार सदाशिव लोखंडे यांनी काढले.

खा. लोखंडे यांनी साई आदर्श मल्टिस्टेटच्या राहुरी फॅक्‍टरी येथील मुख्य कार्यालयाला नुकतीच सदिच्छा भेट दिली. अध्यक्ष कपाळे यांनी त्यांचे स्वागत करून साई आदर्शच्या अल्पकाळातील प्रगती व कामकाजाची माहिती दिली.
संस्थांची आर्थिकस्थिती पाहता साई आदर्श हे नगर जिल्ह्यातील नामांकित मल्टिस्टेट संस्था बनली आहे. अशी संस्था या मतदार संघात आहे. हि अभिमानाची बाब असल्याचे सांगून खा. लोखंडे म्हणाले, मल्टिस्टेट संस्थांचे ग्रामीण अर्थव्यवस्थेत असणारे योगदान व या संस्थाच्या अडचणी दिल्ली दरबारी मांडून मल्टिस्टेट संस्थांना असणारी जाचक बंधने शिथिल करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही खा.लोखंडे यांनी यावेळी दिली.

शिवाजीराव कपाळे म्हणाले, पाच वर्षात संस्थेच्या 18 शाखा कार्यरत झाल्या आहेत. या माध्यमातून संस्थेने 150 तरुणांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. सर्वसामान्यांच्या हिताचे काम करून सर्वसामान्य माणूस व शेतकरी केंद्रबिंदु मानून काम सुरु आहे. यावेळी मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे, संस्थेचे संचालक डॉ. विलास पाटील, विष्णुपंत गिते, किशोर थोरात, अविनाश साबरे, बाळासाहेब तांबे, वेदांत कपाळे, धीरज कपाळे, शिवाजी दिसागस, शिवाजी जाधव, व्यवस्थापक सचिन खडके, शाखाधिकारी याकूब शेख व कर्मचारी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)