नगर – क्रीडा व युवक संचालनालय (पुणे) च्या वतीने नगर जिल्ह्यातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 13 कुस्तीगीरांचे सन 2017-18 चे मानधन जिल्हा क्रीडा कार्यालयात जमा झाले असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी यांनी दिली.

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या कुस्तीगीरांना दरवर्षी आर्थिक प्रोत्साहन म्हणून हे मानधन दिले जाते. यामध्ये सागर राऊत, अण्णा गायकवाड, अक्षय कावरे, विक्रम शेटे, संतोष गायकवाड, विष्णू खोसे, विकास तोरडमल, अजित शेळके, सागर मोहळकर, अनिल ब्राम्हणे, शुभम भोसले, तुषार जगताप, सुभाष गाढवे या कुस्तीगीरांचा समावेश आहे.

वरील मल्लांनी मानधन मिळण्यासाठी आपल्या बॅंक पासबुकच्या झेरॉक्‍ससह जिल्हा क्रीडा कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष पै.वैभव लांडगे व संघ व्यवस्थापक पै.नाना डोंगरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)