आश्‍वासनपूर्ती न झाल्याने कुकाण्यात आमरण उपोषण

 कुकाणा : बेलापुर - परळी या रेल्वे मार्गासाठी प्रमुख उपोषण रितेश भंडारी यांच्यासह कॉ. आप्पासाहेब वाबळे (अंतरवाली), रंगनाथ पंडित ( कुकाणे), राधेशाम महाराज बोरुडे (मजले शहर ता. शेवगाव), प्रभाकर खंडागळे (चिलेखनवाडी) हे उपोणास बसले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः लक्ष देण्याचे दिले होते आश्‍वासन

कुकाणे – शंभर वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बेलापूर-परळी या रेल्वेमार्गाचा सर्वेरिपोर्ट जून 2018 पर्यंत रेल्वे बोर्डाला पाठविण्याचे रेल्वे उपमहाप्रबंधक दिनेश वशिष्ठ यांनी दिलेले लेखी आश्वासन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालण्याचे लेखी आश्‍वासनाला एक वर्ष पूर्ण होऊनही आश्वासनाची पूर्तता न झाल्याने नेवासे तालुक्‍यातील कुकाणे व परिसरातील नागरिकांनी पुन्हा शनिवार दि. 1 डिसेंबरपासून ग्रामपंचायत व्यासपीठावर या आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे.

-Ads-

या उपोषणास सकाळी 11 वाजता येथील ग्रामस्थांचे श्रध्दास्थान असलेले दक्षिणमुखी हनुमान व गणपती मंदिरात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर खंडागळे व नाभिक समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रंगनाथ पंडित यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या उपोषणास प्रारंभ केला. यावेळी चंपालाल बोरा, अनिल पंडित, केशव दंरदले, संपतलाल मुनोत, सुरेश वाबळे, दिगंबर काकडे, रमेश सोनवणे, माजी सरपंच दौलतराव देशमुख, रख्माजी लिपणे यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

“गतवर्षी बेलापूर – परळी या रेल्वे मार्गासाठी सात दिवस उपोषण केले होते, मात्र आश्वासन देवून रेल्वे महाप्रबंधक व मुख्यमंत्री यांच्याकडून जनतेची व लोकप्रतिनिधींची फसवणूक झाली आहे, या विरोधात कुकाणे येथे हे पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. याची सर्व जबाबदारी शासनावर राहणार आहे.
– रितेश भंडारी कुकाणे, प्रमुख उपोषणकर्ते

या उपोषणाचे प्रमुख कुकाणे येथील रितेश भंडारी यांच्यासह कॉ. आप्पासाहेब वाबळे (अंतरवाली), रंगनाथ पंडित ( कुकाणे) राधेशाम महाराज बोरुडे (मजले शहर ता. शेवगाव), प्रभाकर खंडागळे (चिलेखनवाडी) हे उपोणास बसले असुन, सकाळी 11 ते सांयकाळी 6 वाजेपर्यंत कोणीही शासकीय अधिकारी या उपोषण स्थळाकडे फिरकले नाही. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. यावेळी उपोषण कर्त्यासह माजी सरपंच कुमार देशमुख, प्रा. भारत वाबळे, तरवडी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, अण्णासाहेब मुरकुटे, सुरेश नरवणे आदी ठाण मांडून होते.

याबाबत माहिती अशी, या रेल्वे मार्गासाठी गेल्या वर्षी 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर 2017 असे आठ दिवस कुकाणे येथील नागरिकांनी आमरण उपोषण केले होते. यावेळी रेल्वेचे उपमहाप्रबंधक दिनेश वशिष्ठ यांनी जून 2018 पर्यंत सर्वे रिपोर्ट पाठविण्याचे तसेच मुख्यमंत्री यांनी स्वतः लक्ष घालतो, असे लिखित अश्वासन दिले होते.

मात्र जून 2018 ची मुदत संपूनही रिपोर्ट न गेल्याने पुन्हा कुकाणे व परिसरातील नागरिकांनी 2 ऑगष्ट 2018 रोजी मंत्रालय मुंबई येथे आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावर महाप्रबंधक डि. के. शर्मा यांनी खासदार सदाशिव लोखंडे यांना सप्टेंबर 2018पर्यंत अहवाल पाठविण्याचे लिखित दिले. ही मुदत संपल्यानंतर प्रमुख उपोषणकर्ते रितेश भंडारी यांनी अहवालाबाबत विचारणा केली असता, दि. 10 ऑक्‍टोबरला सर्वे प्रगतीपथावर असल्याचे उत्तर मिळाले. परंतु प्रत्यक्षात कुठेच काही नाही, हे लक्षात आले.

या सर्व प्रकारावरून आश्वासन देऊन जनतेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या फसवणुकीमुळे शासनाच्या व रेल्वेच्या विरोधात जनतेत चिड निर्माण झाली. या प्रकारामुळे पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा एल्गार पुकारला आहे. या उपोषणाचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल, रेल्वे राज्य मंत्री मनोज सिन्हा, रेल्वे महाप्रबंधक मुंबई, खासदार दिलीप गांधी, खासदार सदाशिव लोखंडे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हाधिक्षक अ.नगर, जिल्हाधिकारी नगर, पोलीस निरीक्षक नेवासे, तहसीलदार नेवासा यांना देण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)