कुबेर ग्रुपने मैफलीतून जमविला केरळ पूरग्रस्तांसाठी मदतनिधी

नगर- केरळ येथील नैसर्गिक आपत्तीनंतर निर्माण झालेल्या मूलभूत सुविधांचे मोठे आव्हान आहे. कुटूंब समजून केरळच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याची गरज असल्याने व माणुसकीच्या नात्याने रहेमत सुलतान फाऊंडेशन, मखदुम सोसायटी, मुस्कान असोसिएशन व इतर संघटनांनी कुबेर म्युझिकल ग्रुपच्या सहकार्याने जुने हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम सादर करुन या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी गोळा केला.

ऍड.अमीन धारानी, देवदत्त पाउलबुधे, जुबेरभाई, मनोज डफळ आदींनी गीते सादर केली. वैद्यकीय व्यवसायिक डॉ.गुरुड यांनी येसूदास यांचे आपसे पहले आपसे ज्यादा… हे गीत सादर करताच रसिकांनी टाळ्या मिळविल्या. उद्योगपती अभय कांकरिया यांनी मुकेश यांचे सत्यम शिवम सुंदरम्‌ या चित्रपटातील चंचल शीतल कोमल संगीत की देवी… हे गीत सादर करुन रसिकांनी वाऽह वाह मिळविली. आशुतोष देवी यांनी मुकेश यांचे मेरा नाम जोकर मधील जाने कहॉं गये वो दिनफ हे गीत सादर केले. कुबेर ग्रुपमधील एकमेव महिला गायक ऍड. गुलशन धाराणी यांनी अमीन धाराणी बरोबर मिस्टर नटवरलाल मधील परदेसीया ये सच पिया… हे गीत सादर केले.

मदतीच्या कार्यक्रमास कुबेर म्युझिकल ग्रुप नेहमी मोफत सहकार्य करेल, अशी ग्वाही बबलूशेठ यांनी दिली. तसेच अशा मदतीच्या कार्यक्रमांना रहेमत सुलतान सभागृह मोफत दिले जाईल, असे फाऊंडेशनचे अध्यक्ष युनूस तांबटकर यांनी सांगितले. प्रसिद्ध गायक सईद खान, विजय आंग्रे, अन्सार शेख, मखदुम खान यांनी आपआपली गीते सादर केली. आशुतोष देवी यांनी प्रास्ताविक केले. बबलू शेठ, शफकत सय्यद, रामदीन सर, आरीफ सय्यद, शेख फिरोज, संध्या मेढे, अबरार शेख, तारीक शेख, नादीर खान आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. आबीद दुलेखान यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. कमर सुरुर यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)