कोरठणला कुस्त्यांचा आखाडा उत्साहात

नगर – दरवर्षीप्रमाणे श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगावरोठा ता. पारनेर येथे श्रावणात कुस्त्यांचा ( हगामा ) आखाडा झाला , या आखाड्यात उतरलेल्या छोट्यांपासून तरूण पहिलवानांनी नेत्रदीपक कुस्त्या करून आखाडा गाजवला या कुस्त्यांना कुस्तीप्रेमी प्रेक्षक ,भाविक यांनी भरभरून प्रतिसाद देत श्री खंडोबाचे देवदर्शनाबरोबर कुस्त्यांचा आनंद घेतला
परंपरेप्रमाणे कोरठण देवस्थानजवळ देवस्थान ट्रस्ट कडून कुस्त्यांचा आखाडा आयोजित करण्यात आला होता.

दुपारी दोन वाजता आखाडा सुरू झाला यावेळी देवस्थानचे अध्यक्ष ऍड पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष गंगाराम बेलकर,चिटणीस सौ. मनिषा जगदाळे, खजिनदार हनुमंत सुपेकर, दादासाहेब पठारे, सरपंच अशोक घुले,उपसरपंच बाळासाहेब पुंडे, बाबाशेठ खिलारी,किसन धुमाळ,किसन मुंढे,भगवान भामरे,गोपीनाथ सुंबरे,बबन सुपेकर,साहेबराव पंडित,अरुण घुले,देविदास क्षीरसागर,रामदास मुळे,बबन झावरे,छबुराव कांडेकर ,जालिंदर खोसे,सुरेश ढोमे,दिलीप घोडके,बन्सी ढोमे,अमर गुंजाळ,आदींसह सर्व आजी-माजी विश्‍वस्त यांच्या सह ग्रामस्थ,कुस्तीप्रेमी प्रेक्षक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते

या आखाड्यात तीस वर्षाच्या आतील पहिलवानांच्या सुमारे 170 पेक्षा कुस्त्या लावल्या गेल्या ,जिल्ह्यातील तसेच परिसरातील अनेक तरूणमल्ल कुस्त्या खेळण्यासाठी कोरठणला आले होते यामध्ये नॅशनल कुस्ती चॅम्पियन कुमारी वैष्णवी ठुबे, धर्मविर संभुराजे कुस्ती चॅम्पियन विजेती सायली कुरकुटे , पिंपळगावरोठा गावची महीला कुस्तीपटू कुमारी सुंबरे होत्या तर शेवटची कुस्ती 11,111 रुपये बक्षिसाची कुस्ती पहिलवान सागर तराळ टाकळी ढोकेश्‍वर व पहिलवान संदिप कावरे यांच्यात पो उपनिरीक्षक भोसले त्यांच्या हस्ते लावण्यात आली ती बरोबरीत सुटली. विजेत्या पहिलवानांना हजारो रूपयांची बक्षिसे देण्यात आली वैयक्तिकरित्याही अनेक कुस्तीशौकीनांनी बक्षिसे दिली


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)