रग्बी स्पर्धेत आत्मा मालिक अजिंक्‍य 

कोपरगाव – क्रीडा व युवक संचनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा कार्यालय अहमदनगर यांचे संयुक्त विद्यमाने आत्मा मलिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात आयोजित जिल्हास्तरीय शालेय रग्बी स्पर्धेत आत्मा मलिकने सर्वोकृष्ट कामगिरी केली. या स्पर्धेत आत्मा मालिकच्या 14, 17 व 19 वयोगट मुले व मुली असे एकूण पाच संघांनी प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेत स्थान मिळविले. या स्पर्धेत एकूण 42 संघांनी सहभाग घेतला.

अंतिम सामना 14 वर्षे मुले व मुली ओम गुरूदेव इंग्लिश मिडीयम गुरूकूल कोकमठाण विरूद्ध लिटिल लावर स्कुल लोणी यांच्यात झाला. मुले व मुली या दोन्ही संघाने लिटिल लावर स्कूलचा पराभव करून प्रथम क्रमांक मिळविला. 17 वर्षे वयोगटात ओम गुरूदेव इंग्रजी माध्यमाच्या मुलांच्या संघाने विरभद्र विद्यालय अहमदनगर यांचा पराभव करत प्रथम क्रमांक मिळविला. तर ओम गुरूदेव इंग्रजी माध्यमाच्या मुलींच्या संघाने आदर्श विद्या मंदिर शेवगावचा 34-00 फरकाने पराभव करत प्रथम क्रमांक मिळविला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

19 वर्षे वयोगटामध्ये अंतिम सामन्यात आत्मा मालिक ज्युनिअर कॉलेजच्या मुलांच्या संघाने आदर्श विद्यामंदिर शेवगांव संघाचा 42 गुणांच्या फरकाने पराभव केला. विजयी संघ विभाग स्तरावर जिल्हयाचे नेतृत्व करणार आहेत. या खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक आशिष वाकचौरे यांचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी खेळाडूंचे आश्रमाचे संत देवानंद महाराज, संत परमानंद महाराज, अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्‌ठलराव होन, विश्‍वस्त प्रकाश भट, प्रकाश गिरमे, बाळासाहेब गोर्डे, वसंतराव आव्हाड, प्रभाकर जमधडे, माधवराव देशमुख, व्यवस्थापक हिरामण कोल्हे, प्राचार्य निरंजन डांगे, माणिक जाधव, सुधाकर मलिक, नामदेव डांगे, क्रीडा विभागप्रमुख अशोक कांगणे, अजित पवार, सर्व क्रीडा शिक्षक आदिंनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)