‘कोपरगाव’करांच्या आरोग्यासाठी ‘शिवसेना’ खंदकनाल्यात उतरणार

झावरे : जलवाहिनीला गळती लागल्याने नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा

बिले निघतात मात्र लिकेज निघतन नाही

दरमहा दोन लाख रुपये लिकेज काढण्यासाठी, तीन लाख रुपये जलशुध्दीकरण केंद्रावरील देखरेखीसाठी, असे दरमाह पाच लाख रुपये खर्च केला जातो. चार किंवा आठ दिवसांनी पाणी पुरवठा केला, तरी दहा हजार रुपये रोजाप्रमाणे हा खर्च कमी येते. मात्र कुठलेही काम न करता हा खर्च ठेकेदारास दिला जातो. याची चौकशी करण्याची गरज आहे. बिले निघतात तर लिकेज का निघत नाही. मशिनरी काम करते. संजीवनीचे 3-4 लोक मोफत सेवा देतात. मग दररोज 10 हजार कोणाला व कशाचे दिले जातात, याची चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.

कोपरगाव  – कोपरगाव गावठाण भागासाठी असलेली मुख्य जलवाहिनी खंदकनाल्यातून गेली आहे. या जलवाहिनीस याच ठिकाणी गळती लागल्याने दूषित पाणी जलवाहिनीत जाते. त्यामुळे शहराला दूषित पाणीपुरवठा होत आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले असून, त्याकडे नगरपालिकेचे लक्ष वेधूनही कुठलीच कार्यवाही होत नाही. त्यामुळे प्रसंगी पदरमोड करून जलवाहिनी दुरुस्त करून गावठाण भागाला शुद्ध पाणी देऊ, अशी माहिती माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी दिली. भर उन्हात नाकाला रूमाल बांधुन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव यांनी खंदकनाल्यात उतरून पाईपाची पाहणी करून फोटो काढले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोपरगाव शहरातील गावठाण भागातील मेन रोड, सराफबाजार, सप्तर्षी मळा, काले मळा, बाजारतळ, कापड बाजार, गोदाम गल्ली, जुनी मामलेदार कचेरी, स्वा.सावरकर, गांधी चौक, देवी मंदिर, गजानननगर, गिरमे चाळ, कोर्ट रोड या भागाला मुख्य जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. लक्ष्मीनगर, श्रद्धानगरी, संजयनगर, गांधीनगर, कत्तलखाना, सुभाषनगर, तेरा बंगले, कर्मवीरनगर, भगवती कॉलनी, गोकुळनगरी, कोपरेनगर, कोपरगाव बसस्थानक या शहराच्या पश्‍चिम व उत्तर भागातील सर्व मैला व दूषित पाणी खंदक नाल्यात सोडले जाते.

कित्येक दिवसांत नाल्याची सफाई झालेली नाही. त्यामुळे संकटमोचन मारुती मंदिराच्या बाजूकडील नाल्यातील जलवाहिनी दूषित पाण्यात बुडालेली आहे. जलशुद्धीकरण केंद्रातून हजारो लिटर शुद्ध केलेले पाणी गावठाण भागाला दिले जाते. मात्र या जलवाहिनीला गळती लागल्याने नागरिकांना दूषित पाणी मिळत आहे. नळाला काळपट व दुर्गंधीयुक्‍त पाणी येत असल्यामुळे ते पिण्याच्या व वापरा योग्य नसते. या दूषित पाण्यामुळे अनेकांना पोटाचे आजार जडले आहेत.

चार दिवसांआड पाणी सोडण्यात येते. तेही दूषित असल्याने नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. दूषित पाण्यामुळे जलजन्य आजारांच्या रुग्णांत वाढ झाली असून, दवाखाने फुल्ल झाले आहेत. खडकीचे नगरसेवक संजय पवार यांनी मागील सहा महिन्यांपूर्वी सर्वसाधारण सभेत नळास येणाऱ्या दूषित पाण्याची बाटली नगराध्यक्षांच्या टेबलावर ठेवली होती. नुकत्याच झालेल्या सभेतही हा विषय त्यांनी मांडला. मात्र सभा तहकूब झाल्याने निर्णय झाला नाही.

याबाबत पालिकेकडे तक्रार केल्यास माणसे नाहीत, मंजूर नाही, पाईप मिळत नाही, अशी ठरलेली उत्तरे देऊन बोळवण केली जाते. या जलवाहिनीची नुकतीच माजी नगराध्यक्ष झावरे शिवसेनेचे राजेंद्र झावरे, कैलास जाधव, प्रमोद लबडे, शिवाजी ठाकरे, सुरेश गिरे, सलीम पठाण, अस्लम शेख, प्रफुल्ल शिंगाडे, कलविंदर दडियाल, लक्षमण मंजूळ, बाळासाहेब साळुंके, योगेश मोरे यांनी पाहिणी केली. झावरे म्हणाले, नगरपालिका नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. त्यामुळे शिवसेना 20 ते 25 हजारांची पदरमोड करून या जलवाहिनीचे काम करणार आहे. सणासुदीला हे काम करून नागरिकांना शुद्ध पाणी देणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)