‘गणेश’च्या ‘नवनाथां’नी वेधले गावकऱ्यांचे लक्ष

कोपरगाव – राहाता तालुक्‍यातील डोऱ्हाळे या गावातील नाथ भंडाऱ्यात गणेश इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या कोऱ्हाळे येथील विद्यार्थ्यांनी नवनाथांचे वेश परिधान करीत सर्व ग्रामस्थांचे व गावकऱ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून या संतांच्या भूमीत अनेक महान संतानी आपल्या लेखणीतून, वाणीतून समता, बंधुता प्रस्थापित केलेली आहे.

याच पावनभूमीत या संतांना अग्रस्थानी मानून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. डोऱ्हाळे गावातील नाथ भंडारा. या नाथ भंडाऱ्याचे दर श्रावण महिन्यात डोऱ्हाळे या गावात आयोजन केले जाते. या कार्यक्रमात अनेक धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. सनई चौघड्यांच्या पारंपारिक वेशभूषेत, तालासुरात दरवर्षी डोऱ्हाळे गावातील ग्रामस्थ नाथ भंडाऱ्याचे आयोजन करत असतात.

या नाथ भंडाऱ्यासाठी चाळीस दिवस पदयात्रेद्वारे काशीहून गंगेचे पवित्र तीर्थ आणून नवनाथांचा जलाभिषेक केला जातो. नऊ दिवस ग्रंथांचे पारायण केले जाते. भंडाऱ्याच्या दिवशी गावातून मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीमध्ये लहान-थोर गावकरी सर्व सहभागी होत असतात. येथे नवनाथांच्या दर्शनासाठी मोठी रीघ लागते.

गणेश इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज नेहमीच धार्मिक परंपरा सांभाळत आले आहे. या ही वर्षी श्री गणेशच्या वतीने मुलांनी सुंदर अशा झांज व लेझीम पथकाने दिंडीकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. या दिंडीसाठी गणेश शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. विजय शेटे, कार्यकारी विश्‍वस्त भारत शेटे, प्राचार्य रामनाथ पाचोरे यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी प्रा. अनिता कुदळे, प्रियंका चाफेकर, सुहासिनी डांगे, प्रा. विशाल उंडे, प्रा. मुकुंद शिंदे, प्रा. विजय मोगले, क्रीडाशिक्षक विजय गाढवे यांनी मोलाचे सहकार्य केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)