सराफ घाडगे कुटुंबीयांशी पालकमंत्र्यांची चर्चा

कोपरगाव – तालुक्‍यातील कोळपेवाडी येथील दरोडेखारांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या सराफाच्या कुटुंबीयांशी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी चर्चा केली. तालुक्‍यातील कोळपेवाडी येथे लक्ष्मी ज्वेलर्सवर रविवारी सायंकाळी दरोडा पडून 27 लाख रूपयांची लूट झाली होती. त्यावेळी दरोडेखोरांच्या मारहाणीत सराफ शाम घाडगे यांचा मृत्यू झाला होता.

गुरुवारी पालकमंत्री शिंदे यांनी त्यांच्या मातोश्री, पत्नीची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. दरोड्याचा तपास लवकरात लवकर लावू, असे सुतोवाच करत या भागात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले. आमदार स्नेहलता कोल्हे याही यावेळी उपस्थित होत्या.

जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पोलीस तपासाची माहिती पालकमंत्री राम शिंदे यांना दिली. या वेळी पोलीस अधिकारी शिवथरे, रोहिदास पवार, कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक लोखंडे आदी हजर होते. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी या दरोड्याची तपासाची स्थिती जाणून घेत संशयित रेखाचित्रे जारी केले आहे. त्यातील प्रगतीची माहिती घेत या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलिसांना आवश्‍यक त्या सूचना करून काळजी घेण्याबाबत आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)