हुमणी अळीचा दोन हजार शेतकऱ्यांना फटका

कोपरगाव – कोपरगाव तालुक्‍यातील गोदावरी नदीकाठच्या 22 ते 45 गावांत उसावर हुमणी अळीचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. 1 हजार 782 शेतकऱ्यांना त्याचा तडाखा बसला आहे. या संदर्भात आपण जिल्हा कृषी अधिकारी तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटच्या तज्ज्ञांशी चर्चा केली आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची सूचना आपण त्यांना केल्याची माहिती आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली.

तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी जिल्हा कृषी अधीक्षक पंडित लोणारे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना गावोगाव प्रशिक्षण देण्याची कार्यवाही सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले. संजीवनी साखर कारखान्याचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी कारखान्याच्या ऊस विकास विभागामार्फत उपाययोजना सुरू केल्या आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर हुमणी अळीच्या उच्चाटनाची माहिती देण्यात येत आहे. ऊस पीक वाचविण्यावर भर देत आहोत, असे त्या म्हणाल्या. कोपरगाव तालुक्‍यात 1100 हेक्‍टर क्षेत्रावरील ऊस पिकांवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शेतकऱ्यांनी घाबरून न जाता वेळीच त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. हुमणी अळी बाधीत क्षेत्रात शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रकाश सापळे लावून, एरंडीच्या बियांचा वापर करून भुंगे गोळा करावेत. याबाबबत अधिक माहिती हवी असल्यास तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव व संजीवनी कारखान्यांच्या ऊस विकास विभागाशी संपर्क साधावा. यापूर्वीही ऊस पिकावरील लोकरी माव्याचा प्रार्दुभाव रोखण्यात येथील शेतकरी यशस्वी झालेले आहेत. आताही हुमणी अळीचा प्रादुर्भाव कमी करण्याबाबत आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहोत. बोंडअळी, दुष्काळामुळे शेतकरी अगोदरच ग्रासला आहे. हुमणी अळीचे संकट नवीन आहे.

या किडीच्या प्रादुर्भावामुळे बाधीत झालेल्या ऊस पिकाला शासनांकडून काही भरपाई मिळेल, काय याबाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)