कोपरगावात मराठा आरक्षण निर्णयाचे पेढे वाटून स्वागत

संग्रहित छायाचित्र

कोपरगाव – मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची मागणी युती शासनाने पूर्ण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी किचकट प्रक्रियेचा सखोल अभ्यास करून मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल साईबाबा संस्थानचे विश्‍वस्थ व सहकार महर्षी कोल्हे कारखान्यांचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

कोपरगाव शहर व तालुका भाजपाच्या वतीने तसेच सकल मराठा समाजाच्यावतीने या निर्णयाचे शहरातील शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे विधिवत पूजन करून पेढे वाटण्यात आले. तसेच हौतात्म्य पत्करलेल्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. मराठा समाजाने राज्यभर शांततेत मोर्चे काढून आरक्षणाची मागणी केली होती.

तत्कालीन शासनाने याबाबत काढलेला निर्णय न्यायालयात टिकला नाही त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सखोल अभ्यास करून याबाबत मागासवर्ग अहवालाच्या शिफारशी स्वीकारून त्याचे विधेयक विधिमंडळात सादर केले. त्यास सर्वपक्षीय आमदारांनी पाठिंबा दिला. या आरक्षणामुळे मराठा समाजातील वंचितांना याचा लाभ होईल असेही आ. कोल्हे म्हणाल्या.

भाजप तालुकाध्यक्ष शरद थोरात, शहराध्यक्ष कैलास खैरे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पानगव्हाणे, शहराध्यक्ष वैभव आढाव, उपनगराध्यक्ष विजय वाजे, गटनेते रवींद्र पाठक, योगेश बागूल, माजी सभापती सुनील देवकर, शिवाजीराव वक्ते, मच्छिंद्र केकाण, मच्छिंद्र टेके, त्र्यंबकराव सरोदे शासनाचे अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)