कोपरगाव – राज्य शासनाच्या नगरपरिषद संचलनालयाच्या वतीने सप्टेंबर 2018 मध्ये नगरपालिकेच्या विविध पदांकरिता घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये कोकमठाण येथील आत्मा मालिक करिअर ऍकॅडमीच्या तीन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
या परीक्षेत आत्मा मालिक करिअर ऍकॅडमीतील भाऊसाहेब म्हसे, अंकुश घोगरे व सुदर्शन कोरे यांची लेखापाल, करनिर्धारण अधिकारी तसेच संगणक अभियंता या पदावर निवड झाली आहे.
यापूर्वीही आत्मा मलिक करिअर ऍकॅडमीच्या विद्यार्थ्यांची शासनातील विविध उच्चपदस्थ नोकऱ्यांवर वर्णी लागली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने मागील वर्षी घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेतही आत्मा मालिक करिअर ऍकॅडेमीच्या दहा विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात बाजी मारली आहे.
या तिघांना संत गुरुमाऊली, संत देवानंद महाराज, परमानंद महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, सरचिटणीस हनुमंत भोंगळे, आत्मा मालिक ऍकॅडेमीचे संचालक नागेश गायकवाड, कोषाध्यक्ष विठ्ठल होन, विश्वस्त प्रकाश भट, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे, वसंत आव्हाड, प्रभाकर जमधडे, प्राचार्य सुधाकर मलिक आदींनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ऍकॅडेमीचे संचालक नागेश गायकवाड, विक्रम कोळपे, कार्यालयीन अधीक्षक साईनाथ चौधरी आदींचे मार्गदर्शन लाभले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा