अधिकाऱ्यांच्या आश्‍वासनामुळे मायगावदेवीकरांचे उपोषण स्थगित

कोपरगाव – तालुक्‍यातील मायगावदेवी येथील 1 कोटी 46 लाख रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचा जलस्रोत बदलावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कपिलनाथ कलोडे यांनी लेखी आश्‍वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपा तालुका कार्यकारिणी सदस्य प्रवीण भुसारे यांनी दिली.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मायगावदेवी ग्रामपंचायतीने शौचालय लाभार्थ्यांबाबत चुकीचा ठराव पाठविला. त्यामुळे 112 ग्रामस्थ या योजनेपासून वंचित आहेत. तसेच प्रधानमंत्री ग्राम आवास योजनेअंतर्गत ब व ड प्रवर्गातील लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा, ग्रामपंचायत नमुना 8 उतारे नोंद समस्येबाबत जयराम गडाख, अकबर शेख, रामगिरी गोसावी, पंडित गाडे, सुदाम गाडे, बाबा गाडे उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मात्र पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कपिलनाथ कलोडे यांनी आंदोलकांना चर्चेसाठी बोलावून वरील मागण्या तसेच पाणी योजनेचा स्रोत बदलण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

चर्चेत शशिकांत कासार, वाळीबा गाडे, बापू गाडे, भारत कासार, शरद गडाख, भवानी नाजगड आदींनी सहभाग घेतला. दरम्यान आमदार स्नेहलता कोल्हे यांनी देखील मायगांव देवी पाणी योजनेचे काम रखडल्याबाबत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)