सहकारमहर्षी कोल्हे कारखान्यावर लसीकरण 

file photo

ऊस तोडणी कामगारांच्या मुलांचे लसीकरण

कोपरगाव – तालुक्‍यातील शिंगणापूर येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर गोवर, रुबेला लसीकरणास संचालक ज्ञानेश्वर परजणे, भास्करराव भिंगारे, फकिरराव बोरनारे यांच्या प्रारंभ करण्यात आला.
प्रारंभी सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे केन मॅनेजर गोरखनाथ शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

-Ads-

वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज बत्रा यांनी कारखान्याचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व कार्यकारी संचालक जिवाजीराव मोहिते व संचालक मंडळ ऊस तोडणी मजुरांच्या आरोग्याविषयी राबवित असलेल्या योजनांची माहिती देऊन लसीकरण का करावे, याबाबत माहिती दिली.

संवत्सर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत खोत प्रास्तविक करताना म्हणाले, गोवर आजाराने दरवर्षी भारतात 54 हजार बालकांचा मृत्यू होतो. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाने यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली आहे.

जिल्हा लसीकरण पर्यवेक्षक एन. पी. धुमाळ म्हणाले, गोवरबरोबरच रुबेला ही लस 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना देण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याप्रसंगी एस. टी. बनसोडे, माळी, चंदनशीव तसेच अंगणवाडी सेविका उपस्थित होते. परजणे म्हणाले, ऊस तोडणी कामगारांनी गोवर, रुबेला लसीकरणाबाबत असलेले गैरसमज बाजूला ठेवून आपल्या भावी पिढीसाठी मुला-मुलींना ही लस टोचून घ्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)